पुणे- शहरातील वाढती कोरोनाची रुग्णसंख्यनेमुळे महापालिका प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. शहरात कोरोनाची रुग्णसंख्या 100 वरून 1800 वर पोहचली आहे. मात्र रुग्णसंख्या वाढत असली तरी नागरिक आद्यपाही बेफिकिरीने वागताना दिसून येत आहेत. ओमिक्रॉन व कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे शहारातील कोरोनाचे निर्बंधही कडक करण्यात आले आहेत. रुग्णसंख्येची स्थिती लक्षात घेता , गरज भासल्यास कोणत्याही क्षणी शहरातील जम्बो कोविड सेंटर सुरु करण्याची तयारी महापालिकेने दर्शवली आहे.
जम्बो कोविड सेंटरची सद्यस्थिती
कोरोना काळात शहरात 800 बेडचे जम्बो कोविड सेंटर उभारण्यात आले होते. कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर काही काळ जम्बो कोविड सेंटर बंद करण्यात आले होते. मात्र ओमिक्रॉनचे रुग्ण सापडल्यानंतर पुन्हा एकदा जम्बो कोविड सेंटरची साफ सफाई व डागडुजी करण्यात आली. सद्यस्थितीला जम्बो कोविड सेंटरमध्ये 200 बेड सुज्ज करण्यात आले आहेत. आयसीयू वार्डही पूर्णपणे तयार करण्यात आले आहेत. या जम्बो कोविड सेंटरमध्ये जनरल वार्ड तयार ठेवण्यात आले आहेत.
नागरिकांकडून नियमांना हरताळ
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी तसेच वाढत धोका लक्षात घेत महापालिकेने कोरोनाची नियमावली कडक केली आहे. मात्र पुणेकरांकडून या नियमांना हरताळ फासण्याचे काम केले जात असल्याचे चित्र ठिकठिकाणी दिसून येत आहे. शहारातील महत्वाची बाजार पेठ असलेल्या छत्रपती शिवाजी मार्केटमध्ये नागरिकांची भाजीपाला खरेदीसाठी गर्दी जमली होती. यामध्ये मास्क. सोशल डिस्टन्सचे पालन न करता सर्रासपणे खरेदी केली जात होती. नागरिकांबरोबरच घाऊक विक्रत्यांचीही मोठ्या प्रमाणात खरेदी गर्दी निर्माण झाली होती. याप्रकारच्या बेशिस्त गर्दीमुळेच कोरोनाचा संसर्ग वाढत नाही ना अशी स्थिती निर्माण झाली आहे.
हॉटेलवर कारवाई
महापालिकेने घालून दिलेल्या कोरोनाच्या नियमाचे उल्लंघन केल्या प्रकरणी मुंढवा पोलिसांनी चा हॉटेलवर करवाई केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुंढवा परिसरात चार मोठ्या हॉटेलमध्ये पार्ट्यांचे आयोजन करण्यात आले होते. घटना स्थळी घाट पोलिसांनी स्वतः साऊंड सिस्टिम केली बंद केली. कोरोनाच्या नियमावली बाबत हॉटेल मालकांना वेळोवेळी सूचना दिल्या होत्या, तरी अनेक ठिकाणी नियमावली पायदळी तुडवली जात असल्याचे समोर आले आहे. कोरोनाच्या नव्य नियमावलीबाबत हॉटेल मालकांची बैठक घेऊन माहिती देण्यात आली होती तरी उल्लंघन झाल्याने कारवाई करण्यात आली.
Aurangabad | औरंगाबादमधील घाटी रुग्णालयात 61 व्हेंटिलेटर बंद
Aurangabad: विनामास्क फिरताय? तुमचे वाहन Black list मध्ये जाऊ शकते, वाचा किती वाहनधारकांना नोटीस?