जयवंत शिरतर, पुणे : जुन्नर (Junnar) तालुक्यातील पंचायत समितीत सन 2012पासून गटशिक्षण अधिकारी (Group Education Officer) हे पदच रिक्त असल्याने जुन्नर तालुक्यातील शैक्षणिक (Educational) कारभाराचा बट्ट्याबोळ उडाला आहे. कायम स्वरूपी गटशिक्षण अधिकारी नसल्याने पंचायत समितीमधील कर्मचाऱ्यांच्या कामात विस्कळीतपणा येऊन शैक्षणिक कामे प्रलंबित आहेत. याबाबत आळे येथे झालेल्या जुन्नर तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या कार्यक्रमात संबंधित संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. तसेच यावेळेस या शिक्षक संघटनेचे पदाधिकारी व जिल्हा परिषद सदस्य आशा बुचके यांनी जुन्नर तालुक्याचे राष्ट्रवादीचे आमदार अतुल बेनके यांच्यासमोर याबाबतचा पाढाच वाचला होता आणि त्यांना याबाबत विचारणा केली होती. जुन्नर तालुक्यातच नाही तर राज्यातील विविध जिल्ह्यांत शिक्षण विभागातील अनेक पदे रिक्त आहेत. ती भरली जावीत, अशी मागणी होत आहे.
यादरम्यान प्राथमिक शिक्षक सेवक संघटनेच्या वतीने जुन्नर तालुक्याला कायमस्वरूपी गटशिक्षण अधिकारी द्या आणि हा तब्बल 11 वर्षाचा वनवास संपवा, अशा प्रकारची मागणी त्यांनी केली आहे. याबाबत प्राथमिक शिक्षक संघटनेचे जिल्हा सरचिटणीस खंडेराव ढोबळे व जि. प. सदस्य आशा बुचके यांनी ही समस्या लवकरात लवकर सोडविण्याची मागणी केली आहे.
#Pune : जुन्नर तालुक्यातील पंचायत समितीत 2012पासून गटशिक्षण अधिकाऱ्याचे पद रिक्त आहे. याविषयी जिल्हा परिषद सदस्या आशा बुचके आक्रमक झाल्या.#junnar #ashabuchake #educational
अधिक बातम्यांसाठी क्लिक करा https://t.co/EXaQRywSvh pic.twitter.com/qJZEV4RtXd— TV9 Marathi (@TV9Marathi) April 11, 2022
अनेक कामे खोळंबली आहेत. शिक्षकांना त्यांचे काम नीट करता येत नाही. त्यांची कामे मागे पडतात. शिक्षकांना पदोन्नती देऊन ही पदे भरली जाऊ शकतात. वारंवार शासनाकडे मागणी केली आहे. मात्र ती होत नसेल तर शिक्षकांना आंदोलनाशिवाय पर्याय नाही, असे पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे सरचिटणीस खंडेराव ढोबळे म्हणाले.