Pune Crime | अखेर न्याय मिळाला ! आंबेगावमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमाला 20 वर्षांचा सश्रम कारावास

| Updated on: Mar 16, 2022 | 3:07 PM

सात वर्षापुर्वी घटनेच्या दिवशी पीडित मुलीचे आई-वडील शेतात काम करत होते. त्याच दरम्यान पीडित अल्पवयीन मुलगी जवळच्या   झोपडीत होती. झोपडीत मुलगी एकटी असल्याचा गैरफायदा घेत आरोपीने मुलीला उचलून नेत, शेजारच्या उसाच्या शेतात नेऊन तिच्यावर बलात्कार केला.

Pune Crime | अखेर न्याय मिळाला ! आंबेगावमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमाला 20 वर्षांचा सश्रम कारावास
कुख्यात गुंड आणि मोक्काच्या आरोपींच्या संपत्तीवर नागपूर पोलिसांची कारवाई
Follow us on

पुणे – गेल्या काही दिवसात जिल्ह्यात अल्पवयीन मुलींवर (Minor girls ) अत्याचारच्या घटना वाढत असताना दुसरीकडे एका दिलासादायक बातमी समोर आली आहे. आंबेगाव (Ambegav )तालुक्यात सात वर्षापुर्वी मजुर कामगाराच्या 10 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली होती. घटनेचा उलगडा झाल्यानंतर पीडित अल्पवयीन मुलीच्या आईने याची तक्रार मंचर पोलिसात दिली होती. पिडित अल्पवीयन मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमाला राजगुरुनगर जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे (court) शिक्षा सुनावली आहे. न्यायाधीश ए एम अंबाळकर न्यायालयाने 20 वर्ष सक्षम कारावास आणि 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. ज्ञानेश्वर शंकर गुंजाळ ( वय 28 )असे शिक्षा सुनावलेल्या आरोपी नराधमाचे नाव आहे. यामुळे पीडित मुलीला अखेर न्याय मिळाला असल्याची भावना व्यक्त केल्या जात आहेत

अशी घडली होती घटना

सात वर्षापुर्वी घटनेच्या दिवशी पीडित मुलीचे आई-वडील शेतात काम करत होते. त्याच दरम्यान पीडित अल्पवयीन मुलगी जवळच्या   झोपडीत होती. झोपडीत मुलगी एकटी असल्याचा गैरफायदा घेत आरोपीने मुलीला उचलून नेत, शेजारच्या उसाच्या शेतात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. यानंतर घटनेचा उलगडा झाल्यानंतर पीडित अल्पवयीन मुलीच्या आईने याची तक्रार मंचर पोलिसात दिली. चिमकल्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमावर मंचर पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याची सुनावनी राजगुरुनगर राजगुरुनगर जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात सुरु होती या दरम्यान सरकारी वकील अँड रजनी नाईक यांनी 7 साक्षीदार तपासत असे दुष्कृत्ये कराणाऱ्या नराधमाला कठोर शिक्षा होण्याची शिफारस केली जेणेकरुन लहान मुली,महिलांवर होणारे अत्याचार थांबण्यास मदत होईल. यानुसार आज राजगुरुनगर जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. आरोपीला भारतीय दंड विधान संहिता अंतर्गत 376अंतर्गत व सपॉक्सो ऍक्ट अंतर्गत सक्तमजुरीची शिक्षा देण्यात आली आहे. या घटनेत पीडित मुलगी व तिच्या आई यांना विश्वासात घेऊनसाक्ष नोंदवण्यात आली आहे.

Zodiac | बर्फाहून शांत,अत्यंत विनम्र असतात 3 राशीच्या व्यक्ती, जाणून घ्या तुमच्या राशीबाबत

Womens World Cup 2022: भारत अडचणीत, सेमीफायनलमध्ये कसा पोहोचणार? जाणून घ्या गुणतालिकेचं गणित

फेसबुक, ट्विटर सारख्या सोशल मीडियाच्या दुरुपयोगामुळे लोकशाहीला धोका, सोनिया गांधींचा संसदेत हल्लाबोल