कही अमृत, तो कहीं… हवामान खात्याच्या तज्ज्ञांची शायरी, नेमकं काय सूचवायचंय?

| Updated on: Mar 17, 2023 | 11:26 AM

गेल्या काही दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची पिके उद्ध्वस्त झाली आहेत. अचानक झालेल्या या नुकसानामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

कही अमृत, तो कहीं... हवामान खात्याच्या तज्ज्ञांची शायरी, नेमकं काय सूचवायचंय?
rain in maharashtra
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

पुणे : राज्यात कालही अनेक ठिकाणी अवकाळी पावसानं थैमान घातलं. विजांचा कडकडाट, वादळीवाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे नागरिकांची एकच भंबेरी उडाली. पावसामुळे राज्यातील अनेक भागात काहीवेळासाठी बत्ती गुल झाली होती. तर घरी पोहोचणाऱ्या चाकरमान्यांची पावसामुळे चांगलीच दैना झाली. अवकाळीचा तडाखा गेल्या काही दिवसांपासून सुरूच आहे. पण कालपासून तो मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातही सक्रीय झाला आहे. हवामाना खात्याचे तज्ज्ञ के एस होसाळीकर यांनी पुढील दोन ते तीन दिवस राज्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाचा तडाखा बसणार असल्याचा इशारा दिला आहे. तर या अवकाळी पावसामुळे कसं नुकसान झालं… याची माहिती त्यांनी एका शायरीतून व्यक्त केली आहे.

हे सुद्धा वाचा

गेल्या 24 तासात अनेक ठिकाणी गडगडाटी वादळ, सोसाट्याचा वारा, विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडला. काही ठिकाणी गारपीटही झाली, त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पुढील 2 ते 3 दिवस हवामानातील गंभीर इशारे, काळजी घेण्याचा आणि आयएमडीच्या अपडेट्सकडे लक्ष देण्याचा सल्ला आहे, असं के. एस. होसाळीकर यांनी म्हटलं आहे. राज्यात गेल्या काही दिवसात झालेल्या पावसामुळे किती नुकसान झालं याची माहिती त्यांनी शायरीतून व्यक्त केली आहे.

होसाळीकरांची शायरी

कहीं अमृत, तो कहीं …

बादलोंने उपर अंबरको दुल्हनसा सजा दिया,
और मेरे शहर में बारीश की चार बुँदे गिरी,
पर दुर कही गांव में उसका दिल शायद तेज़ धड़का,
आँखों के समंदर में, फिर से पुरा खेत डुब गया |

 

शेतकरी धास्तावला

दरम्यान, उत्तर पुणे जिल्ह्यातील खेड, आंबेगाव तालुक्यात अवकाळी पाऊस आणि वातावरणामध्ये होत असलेल्या बदलाने शेतकरी धास्तावला आहेत. तर शेतात हाता तोंडाशी आलेला घास गेल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. शेतात असलेल्या ज्वारी पिकाला मोठा फटाका बसला असून या वातावरणाच्या बदलाचा सामना शेतकऱ्याला करावा लागत आहे.

पिकांची हानी होण्याची भीती

बुलढाणा जिल्ह्यात खामगाव, बुलढाणा, चिखलीसह अनेक तालुक्यात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस झालाय. त्यामुळे हातातोंडाशी आलेल्या गहू, हरभरा, मका वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धांदल उडू लागली आहे. तर काही ठिकाणी रिमझिम पाऊस सुरूच आहे. खामगाव शहर आणि परिसरात तर 1.4 मि.मी. पाऊस झाल्याची नोंद स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीने केली आहे. गेल्या 3 दिवसांपासून हवामानात बदल झाला असून ढगाळ वातावरणाने किंचितच सूर्यदर्शन होत आहे.

सतत तीन दिवसांपासून ढगाळ वातावरणाने शेतकऱ्यांची धांदल उडत आहे. सध्या गहू, हरभरा तयार झाला असून तो शेतकऱ्यांच्या घरात येणे बाकी आहे. या अवकाळी पावसाने या पिकांची हानी होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त होवू लागली आहे. त्यामुळे पीक वाचविण्यासाठी शेतकरी चिंतातूर झाले आहे..