भूषण पाटील, कोल्हापूर : एखाद्या चित्रपटातील थरराप्रमाणे सोने, चांदीची लूट करण्याची घटना कोल्हापूर-पुणे दरम्यान घडली. या घटनेत सात किलो सोने अन् चांदीच्या विटा घेऊन चोरटे फरार झाले आहेत. रविवारी भल्या पहाटे घडलेल्या या घटेनेचा पोलिसांनी तपास सुरु केला. परंतु पोलिसांना फक्त पीकअप गाडी सापडली आहे. मात्र सोने-चांदी घेऊन चोर इनोव्हा कार आणि दुचाकीवरून फरार झाले आहेत. लुटमारीत सहभागी असणारे तीन आरोपी असल्याचे समजते.
नेमके काय घडले
सातारा बोरगाव हद्दीत कुरिअर घेऊन जाणाऱ्या पीकअप गाडी सोने आणि चांदीच्या विटा घेऊन जात होती. या गाडीत सात किलो सोने, चांदीच्या विटा होत्या. चोरट्यांनी या गाडीचा पाठलाग सुरु केला. कोल्हापूरहून पुण्याच्या दिशेने पाठलागचा थरार सुरु होता. बॉलीवूड चित्रपटाप्रमाणे हा पाठलाग सुरु होता. परंत पीकअप गाडीतील चालकाला त्याची कल्पना आली नाही. मध्यरात्री 2 ते 3 वाजता गाडी बोरगाव हद्दीत आली. त्यावेळी चोरट्यांनी गाडीला अडवत, धमकवत गाडीत असणाऱ्या 7 किलो वजनाच्या सोने आणि चांदीच्या विटांची लूट केली.
पोलिसांनी सुरु केला तपास
मध्यरात्री 2 ते 3 वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर लगेच
लुटारूंच्या शोधासाठी पोलीस पथक रवाना झाले. लुटारूंचा पाठलाग करत असताना पोलिसांना पीकअप गाडी सापडली. मात्र सोने-चांदी घेऊन चोर इनोव्हा कार आणि दुचाकीवरून झाले फरार झाले.
पीकअप गाडीची माहिती कशी मिळाली
पीकअप गाडीतून सोने, चांदी जात असल्याची माहिती लुटारुंना कशी मिळाली? लुटारुंनी रेकी केली होती का? या प्रश्नाच्या उत्तरातून पोलिसांच्या तपासाची दिशा ठरणार आहे.