पिंपरी- मागील काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर (Social Media )अश्लील भाषेत शिवीगाळ करत , कलम ३०२ करण्याचे व्हिडीओ बनवणाऱ्या थेरगाव क्वीनच्या पिंपरी चिंचवड पोलिसांनी (Pimpri Chinchwad police ) चांगल्याच मुसक्या आवळल्या होत्या. त्यानंतर आपण केवळ प्रसिद्धीसाठी असे व्हिडीओ तयार केल्याची माहिती संबंधित युवतीने दिली होती. याच थेरगाव क्वीनबरोबर धमकीचे व्हिडीओ काढणाऱ्या कुणाल कांबळेच्याही (Kunal kamble)पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. पोलिसांनी अटक करताच आरोपी कुणाला कांबळेला चुकीची उपरती झाली आहे. माफी मागून गयावया करता असल्याचे समोर आले आहे. मी या प्रकारे धमकीचे व्हिडीओ बनवून चूक केली यापुढे करणारा नाही असा माफी मागतानाच व्हिडीओ समोर आले आहे.
काय आहे प्रकरण
पिंपरी चिंचवडमधील अश्लील भाषेत व्हिडीओ तयार करणाऱ्या थेरगाव क्वीनवर कारवाई करत तिला ताब्यात घेतलं होत. वाकड पोलिसांनी ही कारवाई करत तिच्या सोबतच्या लोकांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली. तिच्या सोबत सद्यस्थितीला अटक केलेल्या आरोपी कुणाला कांबळे यानेही व्हिडीओ बनवले होते. शिवीगाळ, भांडणापासून सुरु होणारे हे व्हिडीओ थेट हत्या करण्यापर्यंत पोहचालयाने ते चांगलेच चर्चेत आले होते. सोशल मीडियावर चर्चिले जाणाऱ्या या व्हिडीओची पोलिसांनी दाखल घेतल्याने असे व्हिडीओ बनवणाऱ्यांना अल्पवयीन तरुणांना या मुळे चाप बसण्यास मदत होणार आहे
कारवाईची गरज
या स्वयंघोषित “थेरगाव क्वीन”चे अवघ्या काही पोस्टमध्ये सत्तर हजार फॉलोअर्स झालेत. यावरून सोशल मीडियावरील रिकामटेकड्यांची तिला पसंती मिळते हे सिद्ध आहे. त्यामुळे ही वृत्ती जागीच ठेचुन काढण्याचं आव्हान पोलिसांसमोर असेल. अन्यथा उद्या आणखी स्वयंघोषित राण्यांचा सुळसुळाट पहायला मिळू शकतो. सोशलमीडिया वरचे व्हिडीओ करून चांगल्या प्रकारची प्रसिद्धी ही अनेकांनी मिळवलीय. पण दहशत पसरवण्यासाठी किंवा सवंग लोकप्रियतेसाठी अश्लील व्हिडिओ तयार करत असाल तर मात्र तुमची रवानगी या थेरगाव क्वीन सारखी जेल मध्ये होईल, हे मात्र नक्की!
Corona Updates| कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत औरंगाबादेत 46 बळी, मागील आठ दिवसात 20 रुग्णांचा मृत्यू!
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बच्चू कडूंनी पोलीस अधिकाऱ्याला झापलं! ऑडिओ क्लिप व्हायरल