पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर दरड कोसळली, वाहतुकीवर झाला परिणाम

| Updated on: Jul 24, 2023 | 12:00 PM

Pune News : पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर लोणावळा लगत रविवारी रात्री दरड कोसळलीय होती. यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. वाहनांचा रांगा लागल्या होत्या. यंत्रणेकडून दरड हटवण्याचे काम रात्रीच सुरु करण्यात आले होते.

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर दरड कोसळली, वाहतुकीवर झाला परिणाम
Follow us on

रणजित जाधव, पुणे | 24 जुलै 2023 : लोणावळा परिसरात मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर दोन ठिकाणी दरड कोसळल्याची घटना घडली आहे. लोणावळाजवळ खंडाळा घाटात दरड कोसळली. रविवारी रात्री ही घटना घडली. तसेच आडोशी बोगद्याच्या जवळ दरड कोसळली. यामुळे मुंबईकडील जाणारी वाहतूक ठप्प झाली होती. प्रशासकीय यंत्रणेकडून दरड हटवण्याचे काम सुरू करण्यात आले. त्यानंतर वाहतूक सोमवारी सकाळी सुरळीत झाली नाही. धिम्या गतीने वाहतूक होत आहे. या घटनेत सुदैवाने कोणी जखमी झाले नाही.

वाहनांचा लागल्या रांगा

पुणे मुंबई महामार्गांवर रात्री 10.30 च्या सुमारास दरड पडून संपूर्ण रस्ता बंद झाला होता. दरड कोसळल्यानंतर मुंबईकडे जाणारी वाहतूक पुन्हा विस्कळीत झालेली आहे. उर्से टोल नाक्याजवळ अनेक वाहने थांबलेली होती. दोन्ही बाजूने वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. रविवारी रात्रीच रस्त्यात पडलेली दरड बाजूला करण्याचे काम सुरु करण्यात आले. या मार्गांवरील दोन लेन सुरु करण्यात आल्या आहेत. आता लोणावळा लगतच्या मार्गावरील दरड हटविल्याच यंत्रणेकडून सोमवारी सांगण्यात आले. त्यानंतर दोन्ही बाजूची वाहतूक काही प्रमाणात सुरु झाली आहे.

वाहतूक वळवली

उर्से टोल नाक्याजवळ दरड कोसळल्यानंतर वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे पुणे-मुंबई मार्गावरील वाहतूक उर्से तळेगावपासून वळवण्यात आली होती. दरड कोसळल्याची माहिती मिळाल्यानंतर आयआरबी, देवदूत यंत्रणा, महामार्ग पोलीस लागलीच घटनास्थळी पोहचले. त्यांनी कामाला रात्रीच सुरुवात केली. जेसीबी, डंपरचा वापर करुन कोसळलेली दरड काढण्याचे काम केले गेले. त्यानंतर सोमवारी सकाळपासून दोन्ही लेनमधील वाहतूक पूर्णपणे सुरळीत सुरु झाली नाही.

हे सुद्धा वाचा

लोणावळ्यात मुसळधार पाऊस

गेल्या आठवड्यापासून लोणावळ्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. यंदा मान्सून उशिरा दाखल झाल्यानंतर मध्यंतरी पावसाने विश्रांती घेतली होती. आता गेल्या आठवड्यापासून पुणे घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस सुरु आहे. यामुळे घाटात दरड कोसळण्याच्या घटना घडत आहे. वेल्हा तालुक्यात राजगडाच्या बालेकिल्ल्याच्या मार्गात दरड कोसळल्याची घटना शनिवारीच घडली होती. यानंतर या ठिकाणी पर्यटकांना जाण्यास बंदी करण्यात आली.