व्हिडिओ लाइक करुन कमवण्याचा फंडा, पुण्यात इंजिनिअरने गमावले नऊ लाख

| Updated on: Apr 25, 2023 | 6:10 PM

Online Job fraud : ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार रोज वाढताय. यासंदर्भातील बातम्या प्रसिद्ध होऊनही जास्त पैशांचा लालच मोठ्या फसवणुकीकडे घेऊन जाते. पुणे शहरात पुन्हा एक नवीन प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

व्हिडिओ लाइक करुन कमवण्याचा फंडा, पुण्यात इंजिनिअरने गमावले नऊ लाख
Cybercrime-1
Image Credit source: socialmedia
Follow us on

पुणे : ऑनलाइन फसवणूक करण्याच्या घटना गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहे. ऑनलाईन असणारे सायबर चोरटे नवीन नवीन शक्कल लढवून लोकांना जाळ्यात ओढतात. मग त्यांनी दिलेल्या सापळ्यात अनेक जण अडकतात. यामध्ये आयुष्यभराची कमाई अनेक जणांनी गमावली आहे. नुकतीच पुणे शहरातील एका माजी सैनिकाची सुमारे एक कोटी रुपयांमध्ये फसवणूक झाली होती. आता एका इंजिनिअरची नऊ लाखांत फसवणूक झाली आहे. ही घटना 14 ते 20 एप्रिल दरम्यानची आहे. आता फसवणूक झालेल्या इंजिनिअरने साइबर क्राइम सेलकडे ऑनलाइन तक्रार केली आहे.

काय आहे प्रकार

वाकड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक आर.एम.मसल यांनी सांगितले की, एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या अभियंत्याला १२ एप्रिल रोजी घरी बसल्या पैसे कमवण्यासंदर्भातील मेसेज मिळाला. यामध्ये रोज पाच हजार रुपये कमवता येणार होते. व्हिडिओला लाईक करण्याचा हा प्रोजक्ट होता. एका लाइकला ५० रुपये देण्यात येणार होते. मग यानंतर या प्रोजेक्टमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवले. त्यातून ३० टक्के रक्कम मिळणार असल्याचे सांगण्यात आले.

हे सुद्धा वाचा

मग सुरु झाली फसवणूक
सुरुवातीला काही रक्कम त्या इंजिनिअरला देण्यात आली. त्याचा विश्वास संपादन करण्यात आला. अधिक पैसे मिळवण्याचा लोभाने त्याने गुंतवणूक सुरु केली. सुरुवातीला १२ हजार त्यानंतर १६ हजार रुपये दिले. हळहळू एकूण नऊ लाख रुपये त्याने सायबर भामट्यांना दिले. परंतु त्यानंतर त्यांच्याशी सर्व संपर्क बंद झाला.

पोलिसांचे आवाहन

पोलिसांनी ऑनलाईन चोरट्यांकडून फसवणूक टाळण्यासाठी खबरदारी घेण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. लोकांनी अनोळखी व्यक्तीशी कोणताही व्यवहार करुन नये, आपले ओटीपी व बँक खात्याची माहिती कोणाला देऊ नये, सोशल मीडियावर आपली वैयक्तीक माहिती देऊ नये, असे आवाहन केले आहे.

काय काळजी घ्यावी

  • ऑनलाइन कामे करून पैसे कमविण्याची संधी देणार्‍या कोणत्याही मेसेज किंवा जाहिरातींवर विश्वास ठेऊ नका.
  • जेव्हा केव्हा तुम्हाला ऑफर मिळेल तेव्हा ती नीट तपासा.
  • तुमचे बँकिंग तपशील अनोळखी व्यक्तींसोबत कधीही ऑनलाइन शेअर करू नका.
  • तुम्‍ही फसवणुकीला बळी पडल्‍याचा संशय असल्‍यास तत्काळ पोलिसांना कळवा.