अभिजित पोते, पुणे : भाजप प्रदेश कार्यकारिणीची गुरुवारी पुण्यात बैठक झाली. या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले. शरद पवार यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकातील उद्धव ठाकरे यांच्याबद्दलच्या १० वाक्यांचे जाहीर वाचन केले. सर्वोच्च न्यायालयात उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आठ मागण्या वाचून दाखवल्या. देवेंद्र फडणवीस यांच्या या भाषणाची चांगलीच चर्चा सुरु झाली आहे. विशेषत: शरद पवार यांनी त्यांच्या आत्मकथेत उद्धव ठाकरे यांच्याबद्दल लिहिलेल्या मजकूरावरुन राजकीय चर्चा रंगली आहे. त्यावर शरद पवार यांच्या कन्या अन् खासदार सुप्रिया सुळे यांनीही भाष्य केले आहे.
काय म्हणाल्या सुप्रिया सुळे
खासदार सुप्रिया सुळे जांभूळवाडी तलावाची पाहणी करण्यासाठी शुक्रवारी आल्या होत्या. काही दिवसांपूर्वी याच तलावात दुर्गंधीमुळे हजारो मासे झाले होते. यावेळी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, पुणे महापालिका आणि पाटबंधारे विभागाने तातडीने बैठक घेऊन प्रश्न सोडवला पाहिजे. महापालिकेत सध्या अधिकारीच कारभार चालवत आहे. यामुळे या निवडणूक लवकर घेतली पाहिजे, अशी आमची मागणी आहे.
हा प्रकार म्हणजे महापालिका हलगर्जीपणा आहे बाकी काही नाही. या तळ्यातील मासे कोणीही खाऊ नये, असे आवाहन त्यांनी केले.
उद्धव ठाकरे यांच्याबद्दल काय म्हणाल्या
देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात काल उद्धव ठाकरे यांच्यासंदर्भात शरद पवार यांनी लिहिलेली दहा वाक्य वाचून दाखवली. त्यावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, लोक माझे सांगाती हे पुस्तक नीट वाचा. या राजकीय आत्मकथेत १०० गोष्टी चांगल्या आहेत. उद्धव ठाकरे यांच्याबद्दल या फक्त नोट्स काढल्या आहेत. फडणवीस यांनी टीआरपी कसा वाढवावा हे शरद पवार कडून शिका असे म्हटले होते. त्यावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, फडणवीस यांनी पवार यांना दिलेली ही कॉम्प्लेमेंट आहे.
उद्धव ठाकरे यांच्याबद्दलची ती दहा वाक्य
लोक माझे सांगाती पुस्तकामधील फडणवीस यांनी वाचली दहा वाक्य…