पुणे | 22 ऑगस्ट 2023 : पुणे तेथे काय उणे असे का म्हटले जाते, हे नेहमी सिद्ध झाले आहे. पुणेकरांच्या प्रत्येक गोष्टी वेगळ्या असतात. पुणेकरांच्या सवयी, खाद्यपदार्थ, संस्कृती, खेळ राज्यात सहज पोहचतात. पुणे महानगरपालिकेने आपले वेगळेपण या पद्धतीने सिद्ध केले आहे. मनपाने पुणे शहरातील नागरिकांसाठी कोट्यवधी रुपये जिंकण्याची बक्षिसे जिंकण्याची संधी दिली. या संधीची सोडत काढण्यात आली. त्यात पाच जणांना कार जिंकली. काही जणांना दुचाकी मिळाली तर काहींना लॅपटॉप मिळाले.
पुणे महानगरपालिकेने शहरासाठी एक योजना आणली. मनपाचे उत्पन्न वाढवणे आणि पुणेकरांना वेळेवर कर भरण्यास प्रोत्सहान देण्यासाठी ही योजना होती. त्यासाठी कोट्यावधी किंमतीची बक्षिसे मनपाने जाहीर केली. कार, दुचाकी, लॅपटॉप, स्मार्ट फोन तसेच इतर शेकडो बक्षिसांचा समावेश त्यात होता. या लॉटरीची सोडत काढण्यात आली. त्यात पाच जणांना पेट्रोल कार मिळाली. १५ जणांनी ई-बाईक मिळाली. १५ जणांना लॅपटॉप तर १० जणांना स्मार्टफोन मिळाले.
पुणे मनपाच्या या लॉटरीसाठी 45 जण भाग्यवान विजेते ठरले. दीपाली ठाकुर, प्रियंका मुखेकर, माणिक ढोने, आदित्य कुमार आणि गणेश कळमकर यांनी कार जिंकली. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी हा निकाल जाहीर केला. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी मनापाच्या योजनेचे कौतूक केले. यावेळी मनपा आयुक्तांसह अनेक अधिकारी उपस्थित होते. 31 जुलैपर्यंत, दंड न भरता कर भरणारे यासाठी पात्र ठरले होते. या योजनेमुळे मनपाच्या उत्पन्नात दहा टक्के वाढ झाली. या योजनेमुळे नागरिकांनाही फायदा मिळाला आणि मनापाच्या तिजोरीत भर पडली आहे.
गणेश कमळकर यांनी लकी ड्रॉमध्ये मिळालेली कार परत केली आहे. या कारऐवजी मनपाने एक रुग्णावहिका घ्यावी आणि तिचा वापर शहरातील रुग्णांसाठी करावा, असे कळमकर यांनी म्हटले आहे.कळमकर यांच्या या सामाजिक उपक्रमाचे कौतूक केले जात आहे.