अभिजित पोते, पुणे : शिंदे-भाजप युती सरकार पायउतार करण्यासाठी महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) कंबर कसली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना (Shivsena) म्हणजेच महाविकास आघाडी एकत्र येऊन राज्यभरात सभा घेत आहेत. महाविकास आघाडीच्या संयुक्त सभेची सुरुवात संभाजीनगरातून झाली होती.आता मे महिन्यात पुण्यात ही सभा होत आहे. या सभेच्या नियोजनासाठी शनिवारी महाविकास आघाडीच्या पुणे शहरातील नेत्यांची बैठक झाली. बैठकीत सभेसंदर्भात अनेत महत्वाचे निर्णय घेतले गेले.
कुठे होणार सभा
महाविकास आघाडीच्या सभेचे ठिकाणी ठरवण्यात आले आहे. पुणे शहरातील मुख्य भागात ही सभा होणार आहे. शहरातील नाना पेठेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या प्रांगणात घेण्याचा निर्णय महाविकासआघाडीने घेतला.
सभेला किती गर्दी जमवणार
महाविकास आघाडीची सभा 14 मे 2023 रोजी रविवारी होणार आहे. या सभेची जबाबदारी स्वतः अजित पवार यांच्यावर असणार आहे. सभेसाठी एक लाख लोक जमण्यात येणार आहे. महविकास आघाडीचे सर्व नेते या सभेला उपस्थित राहणार आहे.
तो निर्णय टाळणार
महाविकास आघाडीच्या सभेसाठी कुठलाही मानपान होणार नाही. आम्ही सगळे एकाच प्लॅटफॉर्मवर असू, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप व अरविंद शिंदे यांनी केले.
काय आहे हा मानपान
संभाजीनगरात उद्धव ठाकरेंना देण्यात आलेल्या खुर्चीवरून अजित पवार यांना स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. उद्धव ठाकरे यांना पाठीचा त्रास असल्याने तशा प्रकारची खुर्ची देण्यात आली होती. वज्रमूठ सभेत असा कोणताही भेदभाव झालेली नाही, असं अजित पवार म्हणाले होते. मात्र पुण्यातील सभेत ही चूक टाळली जाणार असल्याचे संकेत शहराध्यक्षांनी दिले.
महाविकास आघाडीच्या सभेचा कार्यक्रम असा