पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांने घेतलेल्या इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. राज्यातील इयत्ता दहावीचा निकाल 93.83 टक्के लागला आहे. यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारली आहे. इयत्ता दहावीला राज्यात विद्यार्थीनींचा निकाल 95.87% लागला आहे. तर मुलांचा निकाल 92.5% लागला आहे. राज्यात नागपूर विभागाचा सर्वात कमी 92.49% निकाल लागला आहे, तर कोकण विभागाने 98.11% मार्क मिळवत अव्वल स्थान बळकावलं आहे.
मार्चमध्ये इयत्ता दहावीची परीक्षा पार पडली होती. या परीक्षेला 15 लाख 29 हजार 96 विद्यार्थ्यांनी दिली होती परीक्षा. या परीक्षेत 14 लाख 34 हजार 898 इतके विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. इयत्ता दहावीच्या निकालात नागपूर विभागाचा सर्वात कमी म्हणजे 92.49 टक्के निकाल लागला आहे. तर कोकण विभागाने 98.11 टक्के मिळवत बाजी मारली आहे. आज दुपारी 1 वाजता विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकाल पाहता येणार आहे.
पुणे 95.64%
मुंबई 93.66%
औरंगाबाद 93.23%
नाशिक 92.22%
कोल्हापूर 96.73%
अमरावती 93.22%
लातूर 92.66%
नागपूर 92.05%
कोकण 98. 11%
१. www.mahresult.nic.in
२. http://sscresult.mkcl.org
३. https://ssc.mahresults.org.in
दरम्यान, गुणांबाबत काही अडचण असल्यास गुणपडताळणी, पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पध्दतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून (http://verification.mh-ssc.ac.in) स्वतः किंवा शाळांमार्फत अर्ज करता येणारआहे. आहे. यासाठी आवश्यक अटी/शर्ती व सूचना संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत. गुणपडताळणीसाठी 3 ते 11 जून पर्यंत आणि छायाप्रतीसाठी 3 ते 22 जून पर्यंत अर्ज ऑनलाईन पध्दतीने करता येईल. त्यासोबतच ऑनलाईन पध्दतीने शुल्क (Debit Card/Credit Card/ UPI Net Banking) द्वारे भरता येईल.