दादा मुख्यमंत्री झाले तर अधिक चांगलं..छगन भुजबळांना नेमकं काय सूचवायचं?

| Updated on: Nov 28, 2024 | 3:58 PM

Chagan Bhujbal on CM : महाराष्ट्रात कोण मुख्यमंत्री होणार याविषयीच्या घडामोडींना वेग आला आहे. आज महायुतीचे नेते दिल्लीत दाखल होत आहेत. संध्याकाळी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? याविषयीचा निर्णय होण्याची शक्यता आहे. भाजपाकडून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची चर्चा होत असताना छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?

दादा मुख्यमंत्री झाले तर अधिक चांगलं..छगन भुजबळांना नेमकं काय सूचवायचं?
छगन भुजबळ
Follow us on

महायुतीने या विधानसभा निवडणुकीत दमदार बॅटिंग करत, जागांचा डोंगर रचला. धावफलकावर महाविकास आघाडीची खेळी 50 जागांच्या आता आटोपली. तर महायुतीने झंझावाती प्रदर्शन दाखवले. महायुतीच्या या क्लीन स्वीपमुळे मुख्यमंत्री पदावर त्यांचा दावा सांगण्यात येत आहे. अजित पवार गट आणि एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा निर्णय दिल्लीश्वराकडे सोपवला आहे. तरीही शिंदेसेना आणि दादा गटातील अनेक नेते मुख्यमंत्री पदाबाबत अजूनही आशावादी असल्याचे दिसते.

एकनाथ शिंदे यांच्या शिलेदारांची तलवार म्यान

अजित पवार गटाने महायुतीमधील मोठा भाऊ म्हणून भाजपाला आणि पर्यायाने देवेंद्र फडणवीस यांना जाहीर पाठिंबा दिला. तर त्यानंतर दोन दिवस राज्यात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी शिलेदारांनी जाहीर मतं मांडली. पण काल दुपारी स्वतः माध्यमांसमोर येत एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री निवडीचे सर्व अधिकार अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांना असल्याचे सांगितले. त्यांनी आपण कोणतीही आडकाठी आणणार नसल्याचे वक्तव्य केले. त्यामुळे त्यांच्या शिलेदारांनी तलवार म्यान केली.

हे सुद्धा वाचा

दादा जरी मुख्यमंत्री झाले तरी अधिक चांगलं

दरम्यान छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री पदावर त्यांचा भावना व्यक्त केल्या. दादा जरी मुख्यमंत्री झाले तरी अधिक चांगलं, असे ते म्हणाले. आम्ही मुख्यमंत्रीपदावर कधीही दावा केला नव्हता असं म्हणत त्यांनी त्यावर अधिक भाष्य करणे टाळलं. त्याचवेळी त्यांनी फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाबाबत मोठं भाष्य केले. भाजपाचाच मुख्यमंत्री होईल. फडणवीस मुख्यमंत्री होतील असे ते म्हणाले.

ओबीसी मुख्यमंत्री राज्याला मिळायला हवा का, या प्रश्नावर पण त्यांनी मतं मांडलं. ओबीसी मुख्यमंत्री व्हावा यापेक्षा ओबीसी दलित गरिबांचं संरक्षण करणारा मुख्यमंत्री व्हावा असे ते म्हणाले. त्यांच्या या विधानामुळे मित्र पक्षांच्या मनात त्यांचा नेता मुख्यमंत्री असावा या भावना असल्या तरी संख्याबळाचा सुद्धा विचार करावा लागतो याकडे त्यांनी जणू लक्ष वेधले आहे.

फडणवीस यांचा नैसर्गिक हक्क

दादा जरी मुख्यमंत्री झाले तरी अधिक चांगलं, असं जरी भुजबळ म्हणत असले तरी मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांचा नैसर्गिक हक्क आहे, असे ते म्हणाले. त्यांनी संख्याबळाचा दाखला दिला. या वेळा १३२ आमदार ज्यांचे त्यांचा मुख्यमंत्री होईल. फडणवीस मुख्यमंत्री झाले तर आनंद असे ते म्हणाले. आम्ही मुख्यमंत्रीपदावर कधीही दावा केला नव्हता, याकडे त्यांनी लक्ष वेधले. तसेच फडणवीस यांना शुभेच्छा सुद्धा दिल्या.