पुणे : भाडेकरुने घर मालकिणीची हत्या केल्याची धक्कादायक घटना (Tenant Killed House Owner) उघडकीस आली आहे. अनैतिक संबंधांना (Extra Marital Affair) नकार दिल्याच्या रागातून तरुणाने विवाहितेचा खून केल्याचा आरोप आहे. आरोपीचे महिलेसोबत प्रेमसंबंध असल्याचा दावा केला जातो. मात्र कुटुंबीयांना या प्रकाराची कुणकुण लागताच महिलेने हे संबंध सुरु ठेवण्यास विरोध केला. त्यामुळे चिडलेल्या भाडेकरुने 30 वर्षीय महिलेचा गळा आवळून खून केला. हत्येनंतर महिलेचा मृतदेह घरातील बाथरुममध्ये टाकला. त्यानंतर घराला कुलूप लावून आरोपीने पळ काढला. महिलेचे कुटुंबीय घरी परतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. पुण्यात (Pune Crime) येरवडा परिसरातील लोहगाव भागात रविवारी ही घटना घडल्याची माहिती आहे.
अनैतिक संबंधांना नकार दिल्याच्या रागातून पुण्यात भाडेकरुने घरमालकिणीची हत्या केली. विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीचा शोध सुरु आहे. भाडेकरुने 30 वर्षीय विवाहितेचा गळा आवळून खून केला. त्यानंतर तिचा मृतदेह बाथरुममध्ये फेकून तो पसार झाला.
आरोपी गुलाम मोहम्मद शेख याच्या विरोधात हत्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो मूळचा बिहारचा रहिवासी आहे. गुलाम शेख पुण्याच्या लोहगाव भागातील मोझेआळी परिसरात राहणाऱ्या महिलेच्या घरात भाडेकरु म्हणून राहत होता.
या काळात घर मालकिणीसोबत त्याचे प्रेमसंबंध सुरु झाले. काही दिवसांपूर्वी महिलेच्या कुटुंबीयांना दोघांच्या अनैतिक संबंधांची कुणकुण लागली. त्यानंतर आरोपीला घर रिकामं करण्यास सांगण्यात आलं. त्यानंतर आरोपी लोहगावमधील संत नगर परिसरात राहायला गेला.
रविवारी दुपारी आरोपी महिलेच्या घरी आला होता. त्यावेळी ती घरी एकटीच होती. त्याने महिलेकडे अनैतिक संबंधांची मागणी केली, मात्र तिने नकार दिला. त्यामुळे चिडलेल्या आरोपीने तिचा गळा आवळून खून केला. त्यानंतर तिचा बाथरुममध्ये टाकत घराला कुलूप लावून तो घटनास्थळावरुन पसार झाला.
महिलेचे कुटुंबीय घरी परतल्यानंतर त्यांना घराला कुलूप दिसलं. बराच वेळ महिलेच्या फोनवर संपर्क करण्याचा प्रयत्न करुनही कुठलाच प्रतिसाद मिळाला नाही. अखेर दरवाजा तोडल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. घटनेची माहिती मिळताच विमानतळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आरोपी सध्या पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
संबंधित बातम्या :
नागज घाटात अपघात नाही, तर हत्या; चार महिन्यांनी कोडं सुटलं, गुप्तधन न शोधल्याच्या रागातून खून
दहा रुपयांच्या सिगारेटवरुन वाद, टोळक्याचा दुकानावर हल्ला, दुकानदाराच्या वडिलांची हत्या