कोल्हापूर: राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे अत्यंत धक्कादायक निकाल हाती येत आहेत. या निवडणुकीत भाजपच्या दिग्गज नेत्यांना पराभवाचा मोठा धक्का बसला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार राधाकृष्ण विखे-पाटील यांना त्यांच्या गावातील ग्रामपंचायतीही राखता आल्यान नाहीत. तर भाजप नेते नितेश राणे आणि राम शिंदे यांच्या हातूनही ग्रामपंचायत निसटल्या आहेत. त्यामुळे भाजपसाठी हा सर्वात मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे. (Maharashtra Gram Panchayat Election Results 2021: bjp leaders lost Gram Panchayat Election)
कोल्हापुरातील खानापूर हे चंद्रकांत पाटील यांचं मूळगाव आहे. पण खानापूर ग्रामपंचायतीवर शिवसेनेने 9 पैकी 6 जागा जिंकल्या आहेत. अजून तीन जागांची मतमोजणी सुरू आहे. शिवसेना नेते प्रकाश आबिटकर यांच्या नेतृत्वात शिवसेनेने चंद्रकांत पाटील यांना त्यांच्या घरातच पराभूत केल्याने पाटील यांच्यासाठी हा मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे. या निमित्ताने भाजपला नाकारण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचंही बोललं जात आहे.
विखेंची 20 वर्षांची सत्ता गेली
नगरमध्ये लोणी खुर्द हे भाजप आमदार राधाकृष्ण विखे-पाटील यांचं गाव आहे. या गावातील ग्रामपंचायतीवर गेल्या 20 वर्षांपासून विखे-पाटलांची सत्ता होती. मात्र, या ग्रामपंचायतीच्या 17 पैकी 13 जागा जिंकून परिवर्तन पॅनलने विखे-पाटलांना धोबीपछाड केलं आहे. राधाकृष्ण विखे-पाटील स्वत: भाजपचे आमदार आहेत. त्यांचे चिरंजीव सुजय विखे-पाटील हे खासदार आहेत. असं असतानाही विखे-पाटलांना स्वत:च्या गावातच पराभव पत्करावा लागल्याने विखेंच्या सत्तेला उतरती कळा लागल्याचं बोललं जात आहे.
राणेंना धक्का
भाजपला आणि आमदार नितेश राणेंना सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिला धक्का बसला आहे. कणकवली तालुक्यातील भिरंवडे ग्रामपंचायतचा पहिला निकाल हाती आला आहे. भिरवंडे ग्रामपंचायतीत 7 पैकी 4 जागा बिनविरोध निवडून आणण्यात शिवसेनेला यश आले आहे. त्याशिवाय कणकवली तालुक्यातील एकूण तीन ग्रामपंचायतींपैकी दोन शिवसेनेकडे तर एक भाजपकडे गेली आहे. तालुक्यातील भिरवंडे व गांधीनगर ग्रामपंचायत शिवसेनेकडे तर तोंडवली-बावशी ग्रामपंचायत भाजपकडे आली आहे. कणकवली हा नितेश राणेंचा मतदारसंघ असून राणेंसाठी हा मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे. (Maharashtra Gram Panchayat Election Results 2021: bjp leaders lost Gram Panchayat Election)
राम शिंदेंच्या गटाचा पराभव
अहमदनगरच्या जामखेड तालुक्यातील चौंडी ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वात 9 पैकी 7 जागा जिंकण्यात राष्ट्रवादीला यश आले आहे. तर भाजपचे माजी मंत्री राम शिंदे यांच्या गटाला केवळ दोनच जागा मिळाल्या आहेत. राम शिंदे यांनी सुरुवातीपासूनच रोहित पवार यांच्यावर टीका केली होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करत पवार यांनी काम सुरू ठेवल्याने मतदारांनी त्यांच्या बाजूने कौल दिल्याचं दिसून आलं आहे. हा पराभव शिंदे यांच्यासाठी मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे. (Maharashtra Gram Panchayat Election Results 2021: bjp leaders lost Gram Panchayat Election)
#गुलालकुणाचा – रत्नागिरीत 360 ग्रामपंचायतींसाठी मतदान, आमदार भास्कर जाधव, योगेश कदम यांची प्रतिष्ठा पणाला, दहा वाजता मतमोजणी सुरु होणार, ग्रामपंचायत निवडणुकांचा वेगवान निकाल, सर्वात आधी टीव्ही 9 मराठीवर https://t.co/atVRNYvTQS #GramPanchayatElectionResults pic.twitter.com/85zKJpmtgA
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 18, 2021
संबंधित बातम्या:
ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates: सत्ताधारी शिवसेनेची राज्यभरात विजयी घौडदौड
(Maharashtra Gram Panchayat Election Results 2021: bjp leaders lost Gram Panchayat Election)