सावळा गोंधळ सुरुचं, आरोग्य विभाग गट क परीक्षेच्या नियोजनाचा बोजवारा, पुणे नाशिकमध्ये विद्यार्थी संतप्त

| Updated on: Oct 24, 2021 | 11:12 AM

महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागातील गट क प्रवर्गातील पदांसाठी आयोजित करण्यात आलेल्या परीक्षेत गोंधळ निर्माण झाल्याचं दिसून आलं आहे. पुण्यातील आझम कॅम्पस येथील परीक्षा केंद्रावर 10 ची वेळ देण्यात आलेली असताना तिथे पर्यवेक्षक, परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिका पोहोचल्या नसल्याचं समोर आलं आहे.

सावळा गोंधळ सुरुचं, आरोग्य विभाग गट क परीक्षेच्या नियोजनाचा बोजवारा, पुणे नाशिकमध्ये विद्यार्थी संतप्त
पुणे आरोग्य परीक्षा गोंधळ
Follow us on

पुणे: महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागातील गट क प्रवर्गातील पदांसाठी आयोजित करण्यात आलेल्या परीक्षेत गोंधळ निर्माण झाल्याचं दिसून आलं आहे. पुण्यातील आझम कॅम्पस येथील परीक्षा केंद्रावर 10 ची वेळ देण्यात आलेली असताना तिथे पर्यवेक्षक, परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिका पोहोचल्या नसल्याचं समोर आलं आहे. परीक्षा केंद्रावर सुपरवायझर आले नसल्यानं विद्यार्थी संतप्त झाले आहेत. नाशिकमध्ये देखील परीक्षा केंद्रावर प्रचंड गोंधळ उडालेला आहे. आरोग्य विभागाच्या परीक्षेत पुन्हा एकदा सावळा गोंधळ झाला आहे.

विद्यार्थी संतप्त

पुण्यातील आरोग्य विभागाच्या परीक्षेत मोठा गोंधळ निर्माण झाल्यानं विद्यार्थी संतप्त झाले आहेत. परीक्षा केंद्रावर काही विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका मिळाल्या आहेत. तर, काही जणांना प्रश्नपत्रिका मिळालेल्या नाहीत. आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी पोहोचलेल्या विद्यार्थ्यांनी राज्य सरकार, आरोग्य विभागाविरोधात संताप केला आहे. आरोग्य विभागाच्या गलथान कारभारामुळं विद्यार्थ्यांना अश्रू अनावर झाले आहेत. दोन दोन वेळा परीक्षा द्यायला यावं लागतंय. सिंधुदुर्ग, बीड मधून विद्यार्थी पुण्यात परीक्षेसाठी दाखल झाले होते. विद्याऱ्यांनी तीन तीन हजार रुपये खर्चून परीक्षेसाठी आलो असल्याचं म्हटलंय. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी इथं पोहोचलं पाहिजे.

नाशिकमध्येही गोंधळ

नाशिक जिल्ह्यातील गिरणारे परीक्षा केंद्रावर देखील गोंधळ पाहायला मिळाला. पेपर प्रक्रिया राबवणाऱ्या व्यवस्थेवर विद्यार्थ्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. विद्यार्थी संख्ंयेच्या कमी प्रमाणात प्रश्नपत्रिका उपलब्ध झाल्यानं विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला. प्रश्न पत्रिका घेऊन येणाऱ्यांकडे ओळखपत्र नसल्याचा दावा देखील विद्यार्थ्यांनी केला.

सुधीर मुनगंटीवार काय म्हणाले

परीक्षा घेणाऱ्या कंपन्यांची निवड करताना मोठा भ्रष्टाचार झाला आहे. परीक्षा कंपन्या घेणाऱ्या ब्लॅक लिस्ट मध्ये होत्या. कंपन्यांना ब्लॅक लिस्ट असूनही त्यामध्ये आर्थिक गैरव्यवहार झाला असू शकतो,असं सुधीर मुनंगटीवार म्हणाले.

गोपीचंद पडळकर यांची टीका

आरोग्य विभागाच्या नोकर भरतीच्या परिक्षेवरून राज्यात झालेल्या गोंधळावर आमदार गोपीचंद पडळकर यांनी जोरदार टीका केलीय. भविष्यात आरोग्यमंत्री राजेश टोपे हे आर्थर रोडच्या तुरुंगात असतील अशी टीका पडळकर यांनी केलीय. पडळकर देगलूर विधानसभेच्या पोट निवडणुकीच्या प्रचारात बोलत होते.

इतर बातम्या

India vs Pakistan: मला यावेळी पाकिस्तानचं पारडं अधिक जड वाटतंय, ‘या’ नेत्याकडून टीम इंडियाला सावधगिरीचा इशारा

T20 World Cup 2021, IND vs PAK : आज पाकिस्तानची धुलाई पक्की, सरावादरम्यान विराट कोहलीचा चौकार-षटकारांचा पाऊस

Maharashtra Health department recruitment exam pune nashik issue live update students angry over health department exam problems