पिंपरी चिंचवड : महाविकास आघाडी सरकारमध्ये आम्ही आहोत, त्यामुळे आम्ही पुणे आणि पिंपरी-चिंचवड (Pune Pimpri Chinchwad) आमच्या मित्रपक्षाला पूर्णपणे सोडून दिला नाही, असा सूचक इशारा शिवसेनेचे (Shiv Sena) पुणे जिल्हा संपर्क प्रमुख सचिन अहिर (Sachin Ahir) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) दिला आहे. जवळपास अडीच वर्षांपूर्वी राष्ट्रवादीला रामराम ठोकर सचिन अहिरांनी शिवबंधन हाती बांधले होते. वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना विधानसभा निवडणूक (Worli Vidhansabha) जिंकून देण्यात अहिर यांचा मोलाचा वाटा मानला जातो.
काय म्हणाले सचिन अहिर?
आगामी महापालिका निवडणुकीत मित्रपक्ष सोबत आले तर ठीक, नाही आले, तर आम्ही स्वबळावर आणि पक्ष संघटनेच्या जीवावर काम करु, असं मत सचिन अहिर यांनी व्यक्त केलं. पिंपरी-चिंचवड येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत अहिर बोलत होते.
“शंभर टक्के लढू किंवा 70-80 टक्के लढू, आज काही भाकित करणं उचित ठरणार नाही, कारण प्रभागाच्या रचना कशा होत आहेत, कसे उमेदवार आहेत, कारण काही काम करणारे उमेदवार आमच्या डोळ्यासमोर आहेत, पण तिथे आरक्षण पडलं, तर काय याचा विचार करावा लागेल” असंही सचिन अहिर म्हणाले.
“सुप्रीम कोर्टाने ओबीसी आरक्षणाच्या बाबत दिलेला निर्णय धक्कादायक म्हणावा लागेल, कारण तो स्थगित करुन नवीन निवडणूक घ्यायला सांगितलं आहे, असं होत नाही काही वेळा. नगरपालिकेच्या निवडणुका वेळेवर होतील, की त्याही स्थगित होतील, हाही प्रश्न आमच्यासमोर आहे” असं सचिन अहिर यांनी सांगितलं.
सेनाप्रवेशावेळी केलेलं ‘ते’ वक्तव्य
शरद पवार माझ्या ह्रदयात आहेत, तर उद्धव आणि आदित्य माझ्या शरीरात राहतील. आपण राष्ट्रवादी फोडण्याचं काम करणार नाही, पण शिवसेना वाढवण्याचं काम नक्की करु, असं सूचक वक्तव्य जुलै 2019 मध्ये शिवसेनाप्रवेशावेळी सचिन अहिर यांनी केलं होतं.
सचिन अहिर कोण आहेत?
संबंधित बातम्या :
विधान परिषदेच्या 2 जागांसाठी मतदान, अकोला नागपूरमध्ये शिवसेना भाजपसह काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
मुंबई महापालिकेत रिपाइंचे 25 नगरसेवक निवडून आणा; आठवलेंनी सांगितला भाजपसोबतच्या युतीचा फॉर्म्युला
काँग्रेसवर उमेदवार बदलण्याची नामुष्की, छोटू भोयर ऐवजी मंगेश देशमुखांना पाठिंबा जाहीर