Rain : राज्यातील किती जिल्ह्यांमध्ये पावसाची तूट, पाहा तुमच्या जिल्ह्यात काय आहे परिस्थिती

| Updated on: Sep 05, 2023 | 7:49 AM

Rain In Maharashtra : मान्सून सुरु होऊन तीन महिने झाले आहेत. आता मान्सूनचा फक्त सप्टेंबर महिना राहिला आहे. परंतु राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची तूट आहे. धरणसाठे अजून दमदार पावसाची वाट पाहत आहे. आता सप्टेंबर महिन्यावर सर्व परिस्थिती अवलंबून आहे.

Rain : राज्यातील किती जिल्ह्यांमध्ये पावसाची तूट, पाहा तुमच्या जिल्ह्यात काय आहे परिस्थिती
पावसाचा अंदाज
Follow us on

पुणे | 5 सप्टेंबर 2023 : यंदा हवामान विभागाने मॉन्सूनसंदर्भात वर्तवलेला अंदाज चुकीची ठरणार की काय? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. यंदा मान्सून सरासरीच्या ९६ टक्के पडेल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला होता. परंतु अजून राज्यात पावसाने सरासरी फक्त चार जिल्ह्यांत गाठली आहे. राज्यातील २९ जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस आहे. राज्यातील मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र या भागात दुष्काळाची परिस्थिती आहे. विदर्भामध्येही समाधानकारक परिस्थिती नाही.

काय होता हवामान विभागाचा अंदाज

सलग चार वर्षे चांगला मान्सून झाल्यानंतर यंदा ला-नीनाने निरोप घेतला. आता यंदा अल निनोचा प्रभाव मान्सूनवर असणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला होता. ज्यावेळी अल निनोचा प्रभाव असतो, तेव्हा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडतो. परंतु मागील काही वर्षांची उदाहरण देत हवामान विभागाने कमी पावसाची शक्यता फेटाळून लावली होती आणि सरासरी पावसाचा अंदाज व्यक्त केला होता.

किती वेळा अल निनोचा प्रभाव

2001 ते 2020 या 20 वर्षांचा कालावधीत भारतात सात वेळा अल निनोचा प्रभाव राहिला आहे. त्यावेळी खरीप किंवा रब्बीच्या उत्पादनात घट झाली होती. त्यानंतर महागाई वाढली होती. तिच परिस्थिती यंदा असणार की काय? अशी भीती व्यक्त केली जात आहे.

हे सुद्धा वाचा

कोणत्या जिल्ह्यात किती आहे तूट

  • सिंधुदुर्ग : एक टक्के कमी पाऊस
  • कोल्हापूर :१८ टक्के कमी पाऊस
  • सांगली : ४४ टक्के कमी पाऊस
  • रत्नागिरी : ९ टक्के कमी पाऊस
  • सातारा : ३८ टक्के कमी पाऊस
  • सोलापूर : ३३ टक्के कमी पाऊस
  • उस्मानाबाद : ३० टक्के कमी पाऊस
  • लातूर : १७ टक्के कमी पाऊस
  • नांदेड : १६ टक्के जास्त पाऊस
  • परभणी :३२ टक्के कमी पाऊस
  • बीड : ३९ टक्के कमी पाऊस
  • पुणे : १६ टक्के कमी पाऊस
  • रायगड : ९ टक्के कमी पाऊस
  • मुंबई उपनगर : २४ टक्के जास्त पाऊस
  • ठाणे : २२ टक्के जास्त पाऊस
  • अहमदनर : ३८ टक्के कमी पाऊस
  • औरंगाबाद : ३८ टक्के कमी पाऊस
  • जालना : ५१ टक्के कमी पाऊस
  • नाशिक : १४ टक्के कमी पाऊस
  • बुलढाणा : २८ टक्के कमी पाऊस
  • नंदुरबार : २७ टक्के कमी पाऊस
  • धुळे : २९ टक्के कमी पाऊस
  • जळगाव : २१ टक्के कमी पाऊस
  • अकोला : ३५ टक्के कमी पाऊस
  • यवतमाळ : १ टक्का कमी पाऊस
  • वर्धा : १८ टक्के कमी पाऊस
  • नागपूर : १४ टक्के कमी पाऊस
  • भंडारा : ५ टक्के कमी पाऊस
  • गोंदिया : २३ टक्के कमी पाऊस
  • चंद्रपूर : ११ टक्के कमी पाऊस
  • गडचिरोली : ९ टक्के कमी पाऊस