मुंबई, ठाण्यात तापमानाचा ‘ताप’; बाहेर पडताना काळजी घ्या

| Updated on: May 23, 2024 | 9:18 AM

Maharashtra Weather Forecast : मान्सून लवकर धडकण्याची वार्ता येऊन धडकली असली तरी मुंबई आणि ठाणेकरांना तापमानाचा ताप सहन करावा लागणार आहे. आजपर्यंत या दोन जिल्ह्यांत यलो अलर्ट आहे. त्यामुळे बाहेर पडताना काळजी घ्या.

मुंबई, ठाण्यात तापमानाचा ताप; बाहेर पडताना काळजी घ्या
बाहेर पडताना पाणी सोबत असू द्या
Follow us on

मान्सून लवकरच धडकणार असल्याची वार्ता येऊन धडकली आहे. पण मुंबई,ठाणेकरांना अजून उष्णतेपासून सूटका मिळालेली नाही. सध्या या दोन जिल्ह्यांत उष्णतेची लाट आहे. तापमानाचा ताप या भागातील नागरिकांना सहन करावा लागणार आहे. मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्याला आज, गुरूवीरपर्यंत उष्ण आणि दमट वातावरणाचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. मुंबई आणि ठाण्यामध्ये उष्णतेच्या लाटेची शक्यता असल्याचे प्रादेशिक हवामान विभागाने अंदाज व्यक्त केला आहे.

आर्द्रता वाढल्याने अस्वस्थता

प्रादेशिक हवामान विभागाने पुढील दोन दिवस उष्ण वातावरणाची शक्यता वर्तवली आहे. पावसाळा जवळ येत असल्याने मुंबई हवेतील आर्द्रता वाढली आहे. घामाचा धारा लागल्या आहेत. वातावरणातील या बदलामुळे जीवाची घालमेल होते. शरीरातील पाणी कमी होते. तर पाणी पिल्यावरही दिलासा मिळत नाही. या वातावरणामुळे मुंबईकरांमध्ये अस्वस्थता वाढली आहे.

हे सुद्धा वाचा

तापमानाचा ‘ताप’

गेल्या आठवड्यापासून सुरू असलेला तापमानाचा ताप या आठवड्यातही कायम राहणार आहे.मुंबईत आजचा दिवसही डोक्याला ताप वाढवणारा असणार आहे. तापमान ३६ अंशापर्यंत राहील तर आर्द्रताही ७० टक्क्यांहून जास्त असेल. पाणी जास्त पिण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. तर घराबाहेर पडताना आवश्यक उपाय करण्याचा सल्ला दिला आहे.

यलो अलर्टचा धोका

मुंबई, ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. मुंबईसह उपनगरात दमट वातावरण राहिल. तर सिंधुदूर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव या जिल्ह्यांना पण उष्णतेच्या लाटेचा आणि दमटपणाचा फटका बसणार आहे.सांगली, सोलापूर, परभणी, हिंगोली, लातूर आणि धाराशिव या भागात दोन दिवस उकाडा राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

या जिल्ह्यांत पावसाची शक्यता

आयएमडीच्या अंदाजनुसार, दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्राचा काही भाग आणि विदर्भातील काही जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. रत्नागिरी, सातारा, पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यात काही ठिकाणी तुरळक पाऊस पडू शकतो. काही भागात ढगाळ वातावरण असेल.

उष्णतेच्या दाहामुळे वीजेची मागणी वाढली

काल मुंबईत ४३०० मेगावॅट वीज खर्च झाली. पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात वीजेचा वापर करण्यात आला. वीजेचा पुरवठा करण्याचं वीज ऊत्पादक कंपन्यापुढेही मोठं आव्हान उभं राहिले आहे. मुंबईतील ५० लाख वीज ग्राहकांकडून ही वीज एकाच दिवसात खर्च झाल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

ग्लोबल वॉर्मिंगमुळे तापमान वाढत आहे. त्याचा परिणाम वीजेच्या मागणीवर दिसत आहे. टाटा पॉवर, बेस्ट आणि अदाणी मुंबईत वीज पुरवठा करतात. वाढत्या मागणीमुळे कंपन्यांना अतिरिक्त वीज विकत घ्यावी लागते. त्यांना १२ रुपये प्रती युनिटने ही वीज विकत घ्यावी लागू शकते. परिणामी भविष्यात मुंबईकरांची वीज महागण्याची भीती व्यक्त होत आहे.