पुणे – स्वच्छ भारत मिशन व स्वच्छ महाराष्ट्र मिशन अंर्तगत शहरातील नागरिकांना घरच्या ओल्या कचऱ्यावर कुटुंबस्तरावर होम कपोस्टिंग करण्याला प्राधान्य देत आहे. यामध्ये निवासी कुटुंब कंपोस्ट पीट तयार करत असताना त्यांना कंपोस्ट बिनसाठी महापालिका अनुदान योजना राबवत आहे. यामध्य्ये कुटुंब जरा घराच्या घरी कंपोस्ट पीट करत असेल तर त्याला कंपोस्ट बिन खरेदीसाठी50 टक्के अनुदान देणार आहेत.
अशी केली जाणार मदत
कुटुंबस्तरावर कंपोस्ट पीट तयार करत असताना नागरिकांना कंपोस्ट डस्टबीनची खरेदी करावी लागते. या एका डस्टबीनची किंमत 1098 रूपये आहे. अश्याप्रकारे2 किटची खरेदी केल्यानंतर नागरिकांच्या खात्यात 50 टक्के अनुदान जमा केले जाणार आहेत. महानगर पालिकेच्या परिसरता जमा होणार कचरा कमी करण्याच्या उद्देशाने हा उपक्रमा राबवण्यात येत असल्याची माहिती पालिकेने दिली आहे.
यांना मिळणार फायदा
या योजनेचा फायदा घेण्यासाठी नागरिकांना या नियमांची पूर्तता करावी लागणार आहे. या योजनेसाठी अर्ज करताना नागरिकांनी मिळकत कर भरलेला असावा. त्याची पावती अर्जासोबत जोडायची. कुटुंबाच्या संख्येनुसार डब्बे उपलब्ध करून दिले जाणार आहेत. या योजनेसाठी ठरवलेल्या संख्य पेक्षा अधिक अर्ज आल्यास सोडत पद्धतीने निवड केली जाणार आहे. या योजनेसाठी नागरिकांना कम्पलसरी दोन डस्टबीन खरेदी करावे लागणार आहेत.
एवढा लोकांना मिळाला फायदा
या योजनेअंर्तगत आतापर्यंत पिंपरी चिंचवडमधील 4000 हजार घराना अनुदान देण्यात आले आहे.
प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील 500 कुटुंबाना लाभ.
योजनेसाठीचे अर्ज महापालिकेच्या संकेतस्थळावर व क्षेत्रीय कार्यालयात उपलब्ध.
या योजनेसाठी 500पेक्षा अधिक रजा असल्यास सोडत पद्धतीनं अर्जाची निवड केली जाते.
कोरोना निर्बंध : शाळा, महाविद्यालय, पर्यटनस्थळी कोरोना वाढतो! मग बाजारपेठांमध्ये कोरोना मरतो का?
Pune corona : कोरोनामुळे मुंबईनंतर पुण्याला धडकी, दोन जम्बो कोविड सेंटर सुरू करणार