अभिजित पोते, पुणे, दि. 20 नोव्हेंबर | मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील राज्याच्या दौऱ्यावर निघाले आहेत. पश्चिम महाराष्ट्रानंतर सोमवारी मनोज जरांगे पाटील यांची पुणे शहरातील खराडीत सभा घेतली. या सभेला लाखोंच्या संख्येने युवक होते. मराठा समाजाने अनेकांना मोठे केले. मराठा समाजाची वारंवार फसवणूक होत आहे. यापूर्वी मराठा समाजासाठी नितीन करीर समिती गठीत झाली होती. परंतु त्या समितीच्या अध्यक्षांनाच माहीत नव्हते की आपण अध्यक्ष आहोत. आता आमच्या कुणबी नोंदी सापडत आहे. २९ लाख कुणबी नोंदी मिळाल्या आहेत. मग आतापर्यंत मराठा आरक्षण कोणी लपवून ठेवले. मराठा समाजातील आरक्षणात कोण आहे झारीतील शुक्राचार्य? असा प्रश्न मनोज जरांगे पाटील यांनी विचारला.
मराठा समाजाने नेहमी सर्वांना मदत केली. कधी जातीवाद केला नाही. अडचणीच्या काळात मराठा समाजाने सर्वांना मदत केली. गेल्या ७५ वर्षांत जे जे पक्ष झाले, त्या पक्षातील सर्व नेत्यांना मोठे करण्याचे काम मराठा समाजाने केले. ज्या नेत्यांना मराठ्यांनी मोठे केले, कारण त्यांना हे नेते आपले वाटले. मराठा समाजास विश्वास होता की, कधी अडचण आली तर हे लोक मराठा समाजासाठी मदत करतील. आज आरक्षणासाठी मराठा समाजातील मुलांना आरक्षणांची गरज आहे. परंतु त्यांना कोणी मदत करत नाही. नेते मराठा समाजातील मुलांकडे बघण्यास तयार नाही.
आपण ज्यांना मोठे केले ते आता आरक्षण मिळू देणार नाही, असे म्हणत आहे. यामुळे मराठ्यांना आता तरी सावध व्हा. मराठा समाज मागास आहे, याचे पुरावे मिळत आहेत. राज्यात आतापर्यंत 29 लाख नोंदी सापडले आहेत. मग जर मराठा आरक्षणात होते तर 70 वर्षांपासून कुणी मराठा समाजाचे वाटोळे केले? त्याचे उत्तर आम्हाला द्या. मराठा समाजास आरक्षण कुणी मिळू दिले नाही त्याचे नाव आम्हाला द्या? मराठा समाजास आरक्षण असताना देखील कुणी लपवून ठेवले? आमचे मुडदे कोणी पाडले त्याचे उत्तर द्या, असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.