इंजिनिअरिंग, मेडिकलच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा, तब्बल 1024 कॉलेजांची यंदा शुल्कवाढ नाही

| Updated on: Mar 29, 2021 | 9:25 AM

येत्या शैक्षणिक वर्षात कोणत्याही पद्धतीची शुल्कवाढ न करण्याचा निर्णय महाविद्यालयांनी घेतला आहे. (Many Colleges fees no increase)

इंजिनिअरिंग, मेडिकलच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा, तब्बल 1024 कॉलेजांची यंदा शुल्कवाढ नाही
Students
Follow us on

पुणे : येत्या शैक्षणिक वर्षात कोणत्याही पद्धतीची शुल्कवाढ न करण्याचा निर्णय महाविद्यालयांनी घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील 1 हजार 024 व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयांनी फी वाढ न करण्याचा निर्णय घेतला आहे.  (Many Colleges fees no increase in this academic year)

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी, पालक आणि शैक्षणिक संस्थांसमोर आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. दरवर्षी शुल्क नियामक प्राधिकरणाकडून (एफआरए) उच्च आणि तंत्रशिक्षण विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग आणि कृषी विभागातील अभ्यासक्रमांचे शैक्षणिक शुल्क ठरविण्यात येते. पण यंदा डी-फार्मसी, इंजिनीअरिंग, डिप्लोमा, एमबीए अशा प्रमुख अभ्यासक्रमांसाठी कोणत्याही प्रकारची शुल्कवाढ न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

येत्या शैक्षणिक वर्षात इंजिनिअरिंग, मॅनेजमेंट, फार्मसी, आर्किटेक्चर, वैद्यकीय, अॅग्रिकल्चर, विधी अशा विविध पदवी, पदविका, पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे शुल्क काही दिवसांपूर्वी निश्चित करण्यात आले होते. त्यात 929 कॉलेजांनी गेल्यावर्षीप्रमाणे शुल्क आकारलं जाणार आहे. तर 95 कॉलेज हे 2019-20 या शैक्षणिक वर्षात आकारलेले शुल्क आकारणार आहेत.

राज्यातील 1 हजार 24 व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या कॉलेजांनी हा निर्णय घेतला आहे. शुल्क नियामक प्राधिकरणाकडून याबाबतची माहिती देण्यात आली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

शुल्कवाढ न करणाऱ्या महाविद्यालयांची संख्या

पॉलिटेक्‍निक : 199
पदविका फार्मसी : 153
एमबीए : 99
अभियांत्रिकी : 87
आर्किटेक्‍चर : 26

पुण्यातील कोरोना स्थिती

पुण्यात गेल्या 24 तासांत तब्बल 4 हजार 426 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. दिवसभरात 2 हजार 107 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. तर पुण्यात गेल्या 24 तासांत 35 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. त्यातील 7 जण पुण्याबाहेरील होते. पुण्यातील अॅक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या 33 हजार 123 आहे. त्यातील 645 रुग्णांची स्थिती गंभीर असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

पुण्यातील एकूण रुग्णसंख्या 25 लाख 9 हजार 112 वर जाऊन पोहोचली आहे. तर 22 लाख 770 जण पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहेत. पुण्यात कोरोनामुळे आतापर्यंत 16 हजार 804 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर 5 हजार 219 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

पुण्यात केवळ 60 टक्के लसीकरण

तर दुसरीकडे पुण्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरणामध्ये 1 लाख 6 हजार 242 जणांना आरोगय कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात लसीकरण 99.75 टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. तर 88,738 फ्रंटलाईन वर्कर्सपैकी 81,605 जणांना लस देऊन 91.96 टक्के लसीकरण झाले आहे.

पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात उद्दिष्टापेक्षा 22 टक्के अधिक लसीकरण करण्यात आल्या आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेतही उद्दिष्टापेक्षा 7 टक्के अधिक लसीकरण करण्यात आले आहे. पुणे मनपा हद्दीत 84 टक्के लसीकरण झाले आहे. तर फ्रंटलाइन वर्कर्समध्ये पुणे महापालिकेत केवळ 60 टक्के लसीकरण झाले आहे. (Many Colleges fees no increase in this academic year)

संबंधित बातम्या : 

Maharashtra Corona Update : राज्यात कोरोनाचा कहर, गेल्या 24 तासांत तब्बल 40 हजार 414 नवे रुग्ण, 108 जणांचा मृत्यू

Maharashtra night curfew update : जमावबंदीचा पहिला दिवस, कोणत्या जिल्ह्यात काय कारवाई ? लोकांचा प्रतिसाद कसा?