भोरः माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा,हिच्या संगाने जागल्या दऱ्याखोऱ्यातील शिळा अशी कविता ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कुसुमाग्रज म्हणजेच वि. वा. शिरवाडकर (Kusumagraj) यांनी लिहून ठेवली आहे. संत ज्ञानेश्वरांपासून ते अगदी सध्याच्या अनेक कवीनी मराठी भाषेविषयी (Marathi Language) असलेला अभिमान आपल्या साहित्यातून (Literature) व्यक्त केला आहे. या साहित्यिकांप्रमाणेच आता भोर तालुका पुढे सरसावला आहे. भोर तालुक्यातील 2 हजार 750 महिलांनी महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी पत्र पाठवून विनंती केली आहे. याबाबतची माहिती लेखापाल शुभांगी शिंदे यांनी ही माहिती दिली आहे.
मातृदिनाचं औचित्य साधून भोर तालुक्यातील 2 हजार 750 महिलांनी, महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी थेट आता राष्ट्रपतींनाच विनंती करण्यात आली आहे. भोर तालुक्यातील 38 गावातील महिला बचत गटातील 2 हजार 700 महिलांनी पोस्टकार्ड लिहून त्यांनी राष्ट्रपतींना विनंती केली आहे. त्या पत्रामध्ये या महिलांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यात यावा यासाठी राष्ट्रपतींकडे मागणी केली आहे.
सध्या मराठी भाषेत अनेक प्रकारची साहित्य निर्मिती, चित्रपटनिर्मिती होत असली तरी राज्याबाहेर मात्र मराठी भाषेविषया अनास्था दाखवली जात असते. कर्नाटकातील बेळगावचा सीमावाद कित्येक वर्षापासून वादातीत आहे. कर्नाटक राज्यात मराठी भाषेविषयी होणारी गळचेपी दुर्देवी असल्याचे अनेक मान्यवरांचे आणि राजकीय नेत्यांचे मत असले तरी त्याबाबत अजून कोणताही केंद्र सरकारने निर्णय घेतला नाही. त्यामुळे भोर तालुक्यातील 2 हजार 750 महिलांनी ज्या प्रकारे राष्ट्रपतींना पत्र लिहून मराठी भाषेविषयी आस्था बाळगली आहे ती नक्कीच अभिमानस्पद असल्याचे मत आता अनेक मान्यवर व्यक्त करत आहेत.
भोर तालुक्यातील या महिलांनी महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत दीपस्तंभ लोक संचालित साधन केंद्र, भोरच्या जिल्हा समन्वयक अधिकारी अर्चना क्षीरसागर आणि दीपस्तंभच्या अध्यक्षा चंदन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मातृभाषा दिनानिमित्य औचित्य साधून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पोस्ट कार्ड पाठवून विनंती करण्यात आली. भोरच्या उत्रौली, कोर्ले, वेळू, नाझरे, शिंदेवाडी, वाढटुंबी,अंबवडे, परवाडी, विरवाडी, कापूरहोळ, दिवळे अशा 38 गावातील महिला बचत गटाच्या महिलांनी राष्ट्रपतींना पत्र पाठवलं आहे.
संबंधित बातम्या
शेतकरी उपाशी, कारखानदार तुपाशी, शेतकरीद्रोही सरकारविरोधात आंदोलन करणार, सदाभाऊ खोत FRP वरुन आक्रमक
दहावी-बारावीच्या परीक्षा होणार की नाही, झाल्या तर कशा; सर्वोच्च न्यायालयात होणार फैसला!