माणसं गाढवा सारखी वागली… मालकाने चक्क घोड्यांचे प्रायव्हेट पार्ट शिवले… ; कोल्हापुरातील धक्कादायक प्रकार

| Updated on: Aug 25, 2023 | 11:23 AM

सांगलीत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका घोड्याच्या मालकाने चक्क चार घोडींचे गुप्तांग ताब्यांच्या तारेने शिवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.

माणसं गाढवा सारखी वागली... मालकाने चक्क घोड्यांचे प्रायव्हेट पार्ट शिवले... ; कोल्हापुरातील धक्कादायक प्रकार
horse
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

सांगली | 25 ऑगस्ट 2023 : सांगलीतील एक धक्कादायक आणि अमानवी प्रकार समोर आला आहे. घोड्याच्या मालकाने चक्क चार घोडींचा प्रायव्हेट पार्ट तारेने शिवला आहे. त्यामुळे या घोडी रक्तबंबाळ झाल्या. प्रचंड रक्त वाहू लागल्यानंतर घाबरलेल्या या घोड्यांच्या मालकाने त्यांना सांगलीच्या एका रुग्णालयाजवळ सोडून पसार झाला. काही स्वयंसेवी संस्थाना या धक्कादायक प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी जाऊन या घोडींना प्राण्यांच्या रुग्णालयात दाखल केलं आहे. तसेच या घोडींवर उपचार सुरू करण्यात आले आहेत.

या प्रकरणी संबंधित स्वयंसेवी संस्थने सांगली येथील पोलीस ठाण्यात जाऊन अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पशू क्रुरता अधिनियमांतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी तपास केला असता धक्कादायक माहिती समोर आली आहे. या चारही घोडींना रेसमध्ये धावण्यासाठी उतरवलं जायचं. या घोडींची कामगिरीही नेहमी चांगली व्हायची. पण या घोडींना शिंगरू झालं तर त्या स्पर्धेत धावणार कशा? असा प्रश्न या घोडींच्या मालकांना पडला होता.

हे सुद्धा वाचा

अजूनही अटक नाही

ज्या घोडी शिंगरूला जन्म देणार असतात त्यांना दोन अडीच महिने स्पर्धेत उतरवलं जात नाही. त्यामुळे घोड्यांच्या मालकांचं मोठं नुकसान होतं. त्यामुळे या घोडींच्या मालकांनी घोडींच्या गुप्तांगाना तांब्याच्या तारेनेच शिवलं. त्यामुळे त्या रक्तबंबाळ झाल्या. त्यामुळे घाबरलेल्या या घोडींच्या मालकाने या घोडी एका रुग्णालयाजवळ सोडून पलायन केलं. या प्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आली नाही. या घोडीच्या मालकाचा पोलीस शोध घेत आहेत.

उपचार सुरू

या चारही घोडींचं वय तीन वर्ष एवढं आहे. या घोडींचं वय कमी असल्याने त्या धावण्याच्या स्पर्धेत चांगली कामगिरी करत असतात. मात्र, मालकाच्या गाढवपणामुळे त्या जखमी झाल्या आहेत. एका स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी अजय बब्बर यांनी या घोडींना रुग्णालयात दाखल केलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

यापूर्वीही असंच घडलंय

सांगलीतील ही काही पहिली घटना नाही. यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत. 2020मध्येही अशी घटना घडली होती. त्यावेळी पोलिसात तक्रार दिली होती. मात्र, तीन वर्षानंतरही त्या घोडींच्या क्रूर मालकाला पोलीस शोधू शकले नाहीत, असं अजय बब्बर यांनी सांगितलं. या घोडी बऱ्या झाल्यानंतर पुन्हा रेसमध्ये उतरतील असं सांगितलं जात आहे.

म्हणून स्पर्धेतून बाहेर होतात

सांगलीत घोड्यांची स्पर्धा मोठ्या प्रमाणावर होत असते. रेसिंग नंतर या घोड्यांना चरण्यासाठी सोडलं जातं. त्याचवेळी हे घोडे मॅटिंग करतात. त्यामुळे त्यांना अडीच ते तीन महिने रेसमधून बाहेर ठेवलं जातं, असं पशू चिकित्सक नरेश उप्रेती यांनी सांगितलं.