MPSC मध्ये पुन्हा मेगा भरती, पण आयोगाच्या दिव्याखाली अंधार

| Updated on: Dec 07, 2023 | 1:42 PM

mpsc mega bharti 2023 | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून राज्य शासनासाठी कर्मचाऱ्यांची भरती करण्याची प्रक्रिया राबवली जाते. आता पुन्हा १२ डिसेंबरपासून राज्य शासनाच्या विभागांतील विविध संवर्गातील मिळून ८४२ पदांची भरती प्रक्रिया एमपीएससीकडून राबवली जाणार आहे. परंतु एमपीएससीलाच कर्मचाऱ्यांचा वणवा आहे.

MPSC मध्ये पुन्हा मेगा भरती, पण आयोगाच्या दिव्याखाली अंधार
mpsc
Image Credit source: tv9 Marathi
Follow us on

अभिजित पोते, पुणे | 7 डिसेंबर 2023 : राज्य शासनाच्या विविध पदांची भरती करण्याची प्रक्रिया महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (mpsc mega bharti) कडून केली जाते. सध्या २० ते २२ हजार पदाची भरती प्रक्रिया आयोगाकडून सुरु आहे. आता पुन्हा राज्य शासनाच्या काही विभागांतील विविध संवर्गातील मिळून ८४२ पदांची भरती प्रक्रिया एमपीएससीकडून राबवली जाणार आहे. त्यासाठीची अर्ज प्रक्रिया १२ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. एमपीएससीने प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. त्यात राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य विभागातील पाच, गृह विभागातील १०, उच्च व तंत्रशिक्षण विभागातील एक, सामान्य प्रशासन विभागातील एक, इतर मागास बहुजन कल्याण विभागातील ५७ पदांचा समावेश आहे. तसेच पाणी पुरवठा विभागातील तीन, वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य विभागातील ७६५ पदांची भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.

आयोगाच्या दिव्याखाली अंधार

हजारो पदे भरती मोहीम राबवणाऱ्या महाराष्ट्र राज्यसेवा आयोगाला (एमपीएससी) स्वत:ला मात्र कर्मचारी मिळत नाही. अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे भरतीप्रक्रिया राबवताना आयोगाला चांगलीच कसरत करावी लागत आहे. एमपीएससीची २७२ मंजूर पदे आहेत. त्यातील असिस्टंट डेस्क ऑफिसरची ९६ पैकी २५ पदे रिक्त आहेत. तसेच लिपिकांपैकी ६५ पैकी ४५ पदे रिक्त आहेत. यामुळे पदे भरती करताना अपुऱ्या कर्मचारी वर्गामुळे चांगली कसरत आयोगाची होत आहे. राज्य सरकारला हजारोंच्या संख्येने कर्मचारी देणाऱ्या एमपीएससीच्या दिव्याखाली अंधार आहे.

हे सुद्धा वाचा

एमपीएससीला तरी पुरेसे कर्मचारी द्या

एमपीएससीकडे कामाचा ताण वाढला आहे. मागील वर्षी जवळपास २० हजार जागा भरल्या गेल्या. या वर्षी पुन्हा २० ते २२ हजार जागा भरल्या जाणारा आहेत. परंतु ही सर्व प्रक्रिया करताना कर्मचाऱ्यांवर कामांचा मोठा ताण पडत आहे. यामुळे अनेकवेळा प्रक्रिया लांबत असते. इतर राज्यात आयोगाकडे पुरसे कर्मचारी आहेत. परंतु महाराष्ट्रात कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याचे एमपीएससीतील अधिकाऱ्याने सांगितले.