जयवंत शिरतर , पुणे – जुन्नर (junnar )तालुक्यात सहकार सोसायटीच्या निवडणुकीने (Election of Co-operative Society) ग्रामीण राजकारण ढवळून निघाले आहे .गावागावात गटातटाच्या राजकारणाने भाऊबंदकी राजकारणाचा पारा चढला असुन जिल्हा परीषद आणी पंचायत समिती निवडणुका तोंडावर आल्याने आता नजरा गट -गणाच्या आरक्षणाकडे आहेत.यामुळे गाव यात्रामधेही आता राजकीय पुढारी हजेरी लावुन निवडणूक आल्याची चाहुल देऊ लागले आहेत. गावपातळीवर आर्थिक कणा मानल्या गेलेल्या सोसायटीच्या माध्यमातून शेतीपिकासाठी कर्ज दिले जाते.ग्रामपंचायतीच्या (Gram Panchayat) आणि सोसायट्याच्या निवडणुका महत्वाच्या असतात.यामुळे सर्व राजकीय पक्षांनी या सोसायटीच्या निवडणुकीकडे जास्त लक्ष केंद्रित केले आहे.
कोरोनामुळे सुमारे एकदीड वर्ष या सोसायट्याच्या निवडणूक रेगांळल्या होत्या पर्यायाने त्यांना मुदतवाढ मिळाली होती. आता सर्वच तालुक्यातील सोसायट्याच्या निवडणुका जाहीर झाल्या असून प्रचाराच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे.
सोसायटीची निवडणूक म्हणजे गावाची “मिनी विधानसभा “च असते. सोसायटीमधून एकजण जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी मतदान करतो.त्या प्रतिनिधीला विशेष महत्त्व असते.त्यामुळेच सर्वच पक्षीय राजकीय पुढारी आपापल्या समर्थकांना आपले नशीब आजमावत सांगत असतो व आपली राजकीय ताकद निर्माण करत असतो.याच निवडणुकावर बहुतांश स्थानिक राजकीय समीकरणे अवलंबून असताना दिसुन येतात .हे मात्र तितकेच खरे आहे. ग्रामीण भागात या सोसायटीच्या निवडणुकाना सुरुवात झाल्याने गावपातळीवर मात्र राजकीय वातावरण व भावकीचे वातावरण मात्र चांगलेच ढवळून निघाले आहे .हे तितकेच खरे आहे.
नवी मुंबईतील लॉजवर प्रियकर-प्रेयसी भेटले, आधी जोरदार भांडणं, मग निर्घृण हत्याकांड
लातूरच्या आडत बाजारात सोयाबीनचे भाव वधारले, शेतकऱ्यांमध्ये समाधान