कोळशाच्या टंचाईमुळे प्रकाशाचा सण अंधारात?, मंत्री दानवे म्हणतात, ‘काळजी करु नका, सगळं नियोजन झालंय!’

| Updated on: Oct 31, 2021 | 9:14 AM

दिवाळसण तोंडावर आलेला असताना प्रकाशाचा म्हणवला जाणारा सण अंधारात जाण्याची भीती व्यक्त केली जात होती. मात्र केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी ही शक्यता फेटाळून लावत, दिवाळीत कोणतंही लोडशेडिंग होणार नाही. सगळं नियोजन झालं असल्याचं सांगत राज्यातील जनतेने निश्चित रहावं, असं म्हटलंय.

कोळशाच्या टंचाईमुळे प्रकाशाचा सण अंधारात?, मंत्री दानवे म्हणतात, काळजी करु नका, सगळं नियोजन झालंय!
raosaheb danve
Follow us on

पुणे : गेल्या महिनाभरापासून कोळशाच्या टंचाईने सगळ्यांनाच भेडसावलं आहे. दिवाळसण तोंडावर आलेला असताना प्रकाशाचा म्हणवला जाणारा सण अंधारात जाण्याची भीती व्यक्त केली जात होती. मात्र केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी ही शक्यता फेटाळून लावत, दिवाळीत कोणतंही लोडशेडिंग होणार नाही. सगळं नियोजन झालं असल्याचं सांगत राज्यातील जनतेने निश्चित रहावं, असं म्हटलंय. ते आज पुण्यात बोलत होते.

राज्यात वीजटंचाई होणार नाही

दिवाळीच्या तोंडावर राज्यात वीजटंचाई होणार नाही. केंद्र सरकार वेळ पडली तर सेंट्रल ग्रील्डमधून वीज देणार पण राज्यावर अंधाराचं सावट येऊ देणार नाही, असं शब्द रावसाहेब दानवे यांनी दिलाय. यावेळी मात्र त्यांनी आपल्या स्वभावाप्रमाणे राजकीय फटकेबाजी करणं सोडलं नाही.

एकीकडे राज्य सरकार वीज विकतं आणि वीज नाही म्हणतं हे चुकीचं आहे, असा टोला लगावत केंद्रानं कोळशाचा पुरवठा थांबवला नाही. राज्य सरकारने कोळशाचा साठ केला नाही म्हणून कोळशाची टंचाई झाली, असं म्हणत त्यांनी पुन्हा राज्य सरकारवर खापर फोडलं.

कोळसा टंचाईचं खापर राज्याच्या डोक्यावर

रावसाहेब दानवे यांनी कोळसा टंचाई खापर राज्याच्या डोक्यांवर फोडलं आहे. पावसाळ्यापूर्वी राज्यांनी कोळसा उचलला नसल्यामुळे कोळसा टंचाई झाली असा दावा त्यांनी केला आहे. पावसाळ्यात खदाणीत पाणी साचने किंवा कोळसा भिजण्याची अडचण होते, त्यामुळे राज्यांना कोळसा उचलण्याच्या केंद्राने सूचना दिल्या होत्या. पण, पावसाळ्यापूर्वी राज्यांनी कोळसा उचलला नसल्यामुळे टंचाई झाली. कोळसा टंचाईच्या संकटाला राज्य जबाबदार असल्याचा दावा रावसाहेब दानवे यांनी केला आहे.

केंद्र सरकारमुळे इंधनाचे दर वाढलेले नाहीत

केंद्र सरकारमुळे इंधनाचे दर वाढलेले नाहीत. आंतरराष्ट्रीय दराशी त्याचा संबंध आहे. याला राज्य सरकारही जबाबदार आहे, आंतरराष्ट्रीय दराशी जोडलेले असल्यामुळे देशात इंधनाचा दर वाढतो. तसेच मोदी सरकार अशा प्रकारे इंधनाची दरवाढ करणार नाही, असं दानवे म्हणाले.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी राज्यात वीजनिर्मितासाठी वापरण्यात येणाऱ्या कोळशाची टंचाई भासत होती. राज्या अंधारात बुडण्याचे संकट समोर उभे ठाकले होते. यावेळीदेखील रावसाहेब दानवे यांनी वीजटंचाईला राज्य सरकार जबाबदार असल्याचं म्हटलं होतं. पावसाळ्यापूर्वी राज्यांनी कोळसा उचलला नसल्यामुळे कोळसा टंचाई झाली असा दावा त्यांनी केला होता. पावसाळ्यात खदाणीत पाणी साचने किंवा कोळसा भिजण्याची अडचण होते, त्यामुळे राज्यांना कोळसा उचलण्याच्या केंद्राने सूचना दिल्या होत्या. पण,  पावसाळ्यापूर्वी राज्यांनी कोळसा उचलला नसल्यामुळे टंचाई झाली. कोळसा टंचाईच्या संकटाला राज्य जबाबदार आहे, असे रावसाहेब दानवे म्हणाले होते.

(Minister Raosaheb Danve Says State Government responsible For Coal Shortage)

हे ही वाचा :

Raosaheb Danve | राज्यातील कोळसा टंचाईला सरकार जबाबदार, रावसाहेब दानवे यांचा दावा