पुणे : तुम्हाला विविध पदार्थ खाण्याची आवड आहे का? अनेकांचे नाही तर जवळपास सर्वांचे उत्तर होय येईल. मग जगातील सर्वात चांगला खाद्य पदार्थ कोणता? हा प्रश्न विचारल्यावर अनेक उत्तर येतील. परंतु टेस्टअटलास (TasteAtlas) या वेबसाईटकडून एक यादी जाहीर केली आहे. त्यात जगातील सर्वोत्तम ५० पदार्थांची नावे या यादीत आहे. शाकाहारी पदार्थांमध्ये महाराष्ट्रातील अर्थात पुणे अन् नाशिकमधील सर्वात लोकप्रिय पदार्थांचा समावेश केला आहे. जगातील सर्वोत्तम शाकाहारी पदार्थ हा महाराष्ट्रातील पदार्थ ठरला आहे. भारतात क्रमांक एकवर तर जगात ११ व्या क्रमांकावर आहे.
कोणता पदार्थ आहे
जगातल्या सर्वात चांगल्या शाकाहारी पदार्थात इराणमधील zeytoon parvardeh या पदार्थाने पहिला क्रमांक पटकवला आहे. अकराव्या क्रमांकावर भारतातील पदार्थ आहे. शाकाहारी पदार्थांच्या क्रमांकात भारतातील हा पदार्थ देशात पहिल्या क्रमांकावर आहे. हा पदार्थ म्हणजे पुणे नाशिकमधील सर्वात लोकप्रिय मिसळ पाव. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकालाच मिसळ आवडते. घराघरात हा लोकप्रिय प्रकार आहे. मिसळ पाव महाराष्ट्रीयन पदार्थ असला तरी इतर ठिकाणी त्याचे वेगवेगळे रूप देखील आहे. कोणी मिसळीचा स्वाद ब्रेड सोबत घेतो तर कोणी कडक शेव टाकून खातो.
प्रत्येकाने घेतलाय मिसळचा स्वाद
मिसळ पावचा स्वाद प्रत्येकाने घेतला आहे. शहर असो वा गाव खेडा प्रत्येक मराठी माणसाने मिसळीचा आस्वाद घेतला आहे. आपला हाच पदार्थ जगात लय भारी ठरला आहे. देशातील सर्वात चांगल्या शाकाहारी पदार्थांमध्ये मिसळ पावला स्थान मिळाले आहे.
All about the 100 best-rated vegan dishes in the world: https://t.co/PXKAHn85n4 pic.twitter.com/GD1Wp6Twst
— TasteAtlas (@TasteAtlas) April 23, 2023
कोणी केला निकाल जाहीर
TasteAtlas या वेबसाईटने मिसळीचे वैशिष्ट्य दिले आहे. मग या वेबसाईटने तिला जगातील ११ व्या क्रमांकाचे सर्वोत्तम शाकाहारी खाद्य पदार्थ म्हटला आहे. मिसळ पाव कधी नाष्ट्या म्हणून खातात तर कधी जेवण म्हणून देखील खाल्ली जाते. तिच्यासाठी कोणतेही वेळेचे बंधन नाही. सकाळ असो वा संध्याकाळ खाणाऱ्याचे पोट मात्र मिसळ पावमुळे भरते. मिसळ पावची लोकप्रियता इतकी आहे की अनेक छोट्या मोठ्या उद्योजकांनी आपल्या व्यवसायाची सुरुवात मिसळच्या छोट्या गाड्यापासूनच सुरु केलीय.