काँग्रेसमधील ‘त्या’ लोकांनी मला पक्षाच्या बाहेर काढले? आमदार सत्यजित तांबे यांच्या टार्गेटवर कोण

| Updated on: Aug 25, 2023 | 1:39 PM

satyajeet tambe : देशात काँग्रेसमध्ये असणारे अनेक जण असे आहेत, ज्यांना काही लोकांकडून टार्गेट केले जात आहेत. त्या मी सुद्धा होता. या विषयावर पक्षश्रेष्ठींनी विचार करणे गरजेचे आहे. परंतु आमच्या रक्तात काँग्रेस आहे.

काँग्रेसमधील त्या लोकांनी मला पक्षाच्या बाहेर काढले? आमदार सत्यजित तांबे यांच्या टार्गेटवर कोण
satyajeet tambe
Image Credit source: tv9 Marathi
Follow us on

पुणे | 25 ऑगस्ट 2023 : नाशिक विधान परिषद निवडणुकीतील वाद अजून शांत झालेला नाही. कधीकाळी काँग्रेसमध्ये असलेले आमदार सत्यजित तांबे यांनी पुन्हा चर्चेला तोंड फोडले आहे. पक्षातील काही लोकांनी मला पक्षाच्या बाहेर काढले? असा आरोप त्यांनी केला आहे. यामुळे काँग्रेसमध्ये ते झारीतील शुक्राचार्य आहेत तरी कोण? ही चर्चा सुरु झाली. पुणे शहरात माध्यमांशी बोलताना आमदार तांबे यांनी काँग्रेसमधील वाद आणि अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेस यासंदर्भात भाष्य केले.

काय म्हणाले सत्यजित तांबे

काँग्रेसमधील काही ठरविक लोकांनी टर्गेट करुन मला पक्षाच्या बाहेर ढकलले आहे. परंतु आमच्या रक्तात काँग्रेस आहे. आमच्या विचारात काँग्रेस आहे. शंभर वर्षांपासून आम्ही काँग्रेससोबत जोडले गेले आहोत. मला काही लोकांनी बाहेर ढकलले असेल तर ती पक्षश्रेष्ठींची जबाबदारी आहे की, माझ्यासारख्या लोकांशी संवाद साधला पाहिजे.

हे सुद्धा वाचा

पक्षश्रेष्ठींनी विचार करायला हवा

नाशिक विधान परिषद निवडणुकीत माझ्यासंदर्भात कसे राजकारण झाले हे आपल्या सर्वांसमोर आहे. मी एकटाच नाही तर या देशात काँग्रेसमध्ये असणारे अनेक जण असे आहेत, ज्यांना टार्गेट केले जात आहेत. यावर पक्षश्रेष्ठींनी विचार करणे गरजेचे आहे. सध्याच्या राजकारणाची पातळी खालवली आहे. यामुळे नवीन राजकारण सुरु करण्याची गरज आहे. त्यासाठी युवकांनी राजकारण यावे, अशी अपेक्षा आमदार सत्यजित तांबे यांनी व्यक्त केली.

शरद पवार यांचे केले कौतूक

आमदार सत्यजित तांबे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील वादावर बोलण्यास नकार दिला. परंतु शरद पवार यांचे कौतूक केले. ते म्हणाले की, आपण लहानपणापासून वाचत आलोय की शरद पवार हे जगातील सर्वात श्रीमंत राजकारणी आहेत. श्रीमंत राजकारणी म्हणजे काय तर एका रात्रीत पैसा उभा करू शकतात. चांगल्या लोकांना उभं करू शकतात. टाटा, बिर्ला, अंबानी यांना आणू शकतात. ही मसल पावर त्यांच्याकडे 50 वर्षातील राजकारणामुळे आली आहे. विलासराव देशमुख कायम म्हणायचे की राजकारण करताना सगळ्या प्रकारची लोकं आवश्यक असतात.