पुणे महानगरपालिका निवडणुकीत मनसेचे इंजिन हळूहळू धावणार.. इतक्याच जागांवर लढण्याचा मनसेचा विचार

| Updated on: Feb 02, 2022 | 10:01 AM

मनसेच्या स्थापनेनंतर पुणे महापालिकेतच्या 2012 ची निवडणूक मनसेने लढवली होती. त्यामध्ये त्यांचे 29 नगरसेवक निवडून आले होते. मात्र हाच प्रभाव 2017  च्या महापालिकेत राहिला नाही. या निवडणुकीत मनसेला मोठा फटका बसलेला लढवलेल्या 27 जागांवर त्यांचे केवळ 2  नगरसेवक निवडून आले. त्यानंतर मतांची टक्केवारी घसरतच गेलेली आहे.

पुणे महानगरपालिका निवडणुकीत मनसेचे इंजिन हळूहळू धावणार.. इतक्याच जागांवर लढण्याचा मनसेचा विचार
Raj Thackeray
Follow us on

 प्राजक्ता ढेकळे , पुणे – शहरात आगामी महानगरपालिका निवडणुकांचे वारे वाहू आहे. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या प्रभागांचा प्रा-रूप आराखडानंतर प्रत्येक पक्षाची मोर्चे बांधणीस सुरवात झाली . आघाडी करायची की नाही , स्वबळावर निवडणूक लढवायची याचे अंदाज बांधले जात आहेत. महानगर पालिकेच्या निवडणुकीसाठी(Municipal elections) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही(Maharashtra Navnirman Sena) आपले लक्ष केंद्रित केलं आहे. आगामी निवडणुकीत(Election)  स्वबळावर निवडणूक लढवताना सर्वच जागा लढवण्यासापेक्षा मनसेचे प्राबल्य असलेल्या जागांवरच उमेदवार देत लक्ष केंद्रित करण्याचा विचार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून केला जात आहे. यामुळे येत्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत सर्व १७३ ऐवजी ४० जागा लढविण्याबाबतचा विचार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करण्यात येत आहे. त्यासाठी बैठकांनाही सुरुवात झाली आहे.

 मध्यवर्ती भागांवरच मनसेकडून लक्ष

महानगरपालिकेचा प्रारूप आराखडा प्रसिद्ध होण्यापूर्वीच मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यामध्ये सर्व जागा लढविण्याऐवजी काही जागांवरच लक्ष केंद्रित करण्याबाबत चर्चा करण्यात आली. पक्षाचे नेते अनिल शिदोरे, बाबू वासस्कर, वसंत मोरे, किशोर शिंदे , साईनाथ बाबर, गणेश सातपुते, बाळा शेडगे, योगेश खैरे, रणजित शिरोळे, संतोष पाटील आणि वनिता वागस्कर यावेळी उपस्थित होते. प्रभाग रचनेचा आढावा घेताना पक्षाचे प्राबल्य असलेल्या जागांवरच उमेदवार देण्याबाबत चर्चा करण्यात आली. त्यानुसार जवळपास चाळीस जागा समितीकडून निश्चित करण्यात आल्या आहेत. कोथरूड, पर्वती, शिवाजीनगरसह मध्यवर्ती भागांवरच मनसेकडून लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

महापालिकेतील मनसेच्या नगरसेवकांची संख्या
मनसेच्या स्थापनेनंतर पुणे महापालिकेतच्या 2012 ची निवडणूक मनसेने लढवली होती. त्यामध्ये त्यांचे 29 नगरसेवक निवडून आले होते. मात्र हाच प्रभाव 2017  च्या महापालिकेत राहिला नाही. या निवडणुकीत मनसेला मोठा फटका बसलेला लढवलेल्या 27 जागांवर त्यांचे केवळ 2  नगरसेवक निवडून आले. त्यानंतर मतांची टक्केवारी घसरतच गेलेली आहे. येत्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून युती करेल अश्या चर्चाही रंगल्या जात आहेत. मात्र याबबातच अंतिम निर्णय पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे घेणारा असल्याचे समजत आहे. तसेच मर्यादित जागा लढविण्याबाबतची निर्णयही स्पष्ट होणार आहे.

Kangana Ranaut : ‘परी म्हणू की सुंदरा’ नवाजुद्दीन सिद्दीकीच्या पार्टीत कंगनाचा लूक पाहून हेच म्हणाल, पाहा व्हायरल फोटो!

Nana Patole | अर्थहीन बजेटमुळे देशाला पुन्हा डबघाईस नेण्याचा केंद्र सरकारचा प्लॅन : नाना पटोले

Gupt Navratri 2022 | आज पासून आईचा जागर , गुप्त नवरात्रीला सुरुवात, पण चुकूनही ही कामे करु नका