पुणे : भाजपचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनामुळे पुण्यात लोकसभेची पोटनिवडणूक होणार आहे. या रिक्त जागेवर आता कधीही पोटनिवडणूक जाहीर होणार आहे. यासंदर्भात प्रशासनाकडूनही तयारी झाली आहे. पुणे लोकसभा पोटनिवडणुकीच्या जागेवर इच्छुकांनी दावा सांगण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी भाजपसह काँग्रेस आणि राष्ट्रवादीत यासाठी स्पर्धा लागली आहे. आता मनसे नेते वसंत मोरे यांनी पुणे लोकसभेच्या जागावर आपला दावा केला. राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त दिलेल्या शुभेच्छा फलकांमध्ये वसंत मोरे यांचा उल्लेख भावी खासदार म्हणून केला आहे. त्यानंतर आज त्यांनी आपली महत्वकांक्षा बोलून दाखवली.
मनसेचे पुणे शहरातील डॅशिंग नेते वसंत मोरे यांचे भावी खासदार म्हणून कालच बॅनर लागले होते. त्यानंतर आता वसंत मोरे यांनी गुरुवारी माऊलीच्या पालखीचे दर्शन घेतले. यानंतर टीव्ही ९ मराठीशी बोलताना वसंत मोरे म्हणाले की, माऊलींना मी साकडं घातले आहे. माऊलींना म्हटले की, माझा पक्ष वाढो… पुढच्या वर्षी माऊलींच्या दर्शनाला येताना पुण्याचा खासदार होऊन यायला आवडेल…यामुळे आता पुणे लोकसभेसाठी वसंत मोरे यांनी तयारी सुरु केल्याचे स्पष्ट झाले आहे. मनसे नेते राज ठाकरे यांनी पुणे लोकसभेसाठी भाजप-शिवसेना युतीला पाठिंबा दिला नाही तर मनसेकडून वसंत मोरे निवडणूक रिंगणात उतरणार असल्याची चर्चा यानिमित्ताने सुरु झाली आहे.
आळंदीमध्ये वारकऱ्यांवर लाठीहल्ला झाला होता. आळंदी येथे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थानावेळी वारकरी आणि पोलीस यांच्यात किरकोळ वाद आणि झटापटी झाली. यावेळी पोलिसांनी वारकऱ्यांवर लाठीमार केल्याचा आरोप होत आहे. त्यासंदर्भातील व्हिडिओ समोर आले. त्यावर बोलताना वसंत मोरे यांनी म्हटले की, आळंदीची घटना दुर्देवी आहे. आळंदी सारखी घटना पुन्हा घडू नये प्रशासनाला विनंती आहे.
भाजपकडून शहराराध्यक्ष जगदीश मुळीक, राष्ट्रवादीकडून शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचे लागले होते भावी खासदार म्हणून बॅनर्स काही महिन्यांपूर्वी लागले होते. आता पुण्यातील सिंहगड रोड परिसरात वसंत मोरे यांचे बॅनर्स लागले राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त लागले. वसंत मोरे यांच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा सुरु झाली. त्याला आज वसंत मोरे यांच्याकडून दुजोरा मिळाला.
हे ही वाचा
पुण्यात भावी खासदाराच्या स्पर्धेत मनसेची उडी, वसंत मोरे यांचे लागले बॅनर