ग्रामपंचायतीत मनसेला यश, अमित ठाकरे यांनी घेतला मोठा निर्णय

| Updated on: Nov 11, 2023 | 10:11 AM

Pune News | चहा अनेकांचे आवडे पेय आहे. यामुळे पुणेकरांनी चहाला अमृततुल्याचा दर्जा दिला आहे. चहाची तल्लफ अनेकांना असते. वेळेत चहा न मिळाल्याने नागपूर जिल्ह्यातील एका डॉक्टराने शस्त्रक्रिया सोडली. आता या प्रकरणाची चौकशी सुरु झाली आहे. जिल्हा परिषदेने डॉक्टरास नोटीस बजावली आहे.

ग्रामपंचायतीत मनसेला यश, अमित ठाकरे यांनी घेतला मोठा निर्णय
amit thackeray
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

विनय जगताप, वेल्हा, पुणे | 11 नोव्हेंबर 2023 : राज्यात नुकत्याच ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकीत महायुतीला चांगले यश मिळाले. महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष अपेक्षित कामगिरी करु शकले नाही. विदर्भ आणि मराठवाड्यात बीआरएसने यश मिळवून सर्वांना धक्का दिला. मनसेकडून काही ठिकाणी ग्रामपंचायतींची निवडणूक लढवली होती. मनसे नेते राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी पुणे जिल्ह्याकडे लक्ष दिले आहे. पुणे जिल्ह्यांत या निवडणुकीत मनसेला यश मिळाले. त्यानंतर अमित ठाकरे यांना मोठा निर्णय घेणार आहेत. पुण्याच्या वेल्हा तालुक्यातील पानशेत कुरण ग्रामपंचायतीमध्ये मनसेला यश मिळाले होते. आता अमित ठाकरे ही ग्रामपंचायत दत्तक घेणार आहेत.

अमित ठाकरे यांच्या निर्णयामुळे गावाचा विकास होणार

पुणे येथील वेल्हा तालुक्यातील पानशेत कुरण ग्रामपंचायत अमित ठाकरे दत्तक घेणारे आहेत. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत कुरण ग्रामपंचायतीवर मनसेची सत्ता आली. त्यानंतर मनसे नेते अमित ठाकरे यांनी ही ग्रामपंचायत दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आहे. अमित ठाकरे यांच्या या निणर्यामुळे पानशेत कुरण गावाचा विकास होणार आहे.

नव्या पदाधिकाऱ्यांनी घेतली भेट

ग्रामपंचायतीवर निवडून आल्यानंतर सरपंच प्रगती रवींद्र घाडगे आणि सदस्यांनी अमित ठाकरे यांची भेट घेतली. त्यावेळी अमित ठाकरे यांनी सर्वांचा सत्कार केला. पुणे जिल्ह्यात मनसेची सत्ता आलेली ही पहिलीच ग्रामपंचायत आहे. यामुळे आपण या ग्रामपंचायतीकडे स्वत: लक्ष देऊ, असे अमित ठाकरे यांनी यावेळी बोलताना सांगितले. पर्यटनाच्या दृष्टिकोनातून पानशेत परिसर महत्वाचा आहे. या भागांत दिवसेंदिवस पर्यटन वाढत आहे. या ठिकाणी विकासाच्या दृष्टिने आपण पावले उचलणार आहे, असे अमित ठाकरे यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

अमित ठाकरे यांच्या भेटीप्रसंगीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष संतोष दसवडकर, वेल्हे तालुका अध्यक्ष दिगंबर चोरघे, मुळशी तालुका अध्यक्ष धनंजय टेमघेरे, पुणे जिल्हा सचिव सागर खंडाळे, जनहित कक्षाचे कोंडींबा साठे, उपाध्यक्ष शुभम भोसले, रवींद्र घाडगे, संतोष चोरघे, विकास भिकुले, दादा चोरघे उपस्थित होते.