सुनील थिगळे, शिरुर, पुणे : तुम्ही मोबाईल फोनचा अतीवापर करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी चिंताजनक ठरू शकते. पुणे जिल्ह्यात मोबाईलचा स्फोट झाला आहे. यामध्ये दहा वर्षाचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. त्या मुलाच्या डोळ्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे. हा स्फोट कशामुळे झाला, याचे कारण अजून स्पष्ट झाले नाही. परंतु या घटनेमुळे सर्व पालक वर्ग चिंतत आले आहेत.
कुठे झाला मोबाईलचा स्फोट
शिरूर तालुक्यातील पिंपळसुटी येथे मोबाईलचा स्फोट झाला आहे. मोबाईच्या स्फोट झाल्याने दहा वर्षांचा मुलगा जखमी झाला आहे. साहील नाना म्हस्के असे जखमी झालेल्या चिमुकल्यांचे नाव आहे. त्याच्या डोळ्याला आणि पायाला गंभीर इजा झाली आहे. त्याला पुण्यातील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
मुलांकडून मोबाईलचा वापर वाढला
लहान मुलांकडून मोबाईलचा वापर वाढला आहे. कोरोनाकाळात शाळाही बंद होत्या. त्यावेळी ऑनलाईन शाळा सुरु होत्या. त्यामुळे मुलांना मोबाईलची सवय लागली. आता शाळा ऑफलाईन झाल्या असल्या तरी मोबाईलाचा अतिवापर लहान मुले करत आहेत. मोबाईल अतीवापरामुळे स्फोट होऊन अनेकांचा जीव गेल्याच्या अनेक घटना यापूर्वी घडल्या आहेत. मोबाईल स्फोट होण्यामागचे अनेक कारणे आहेत.
काय आहे स्फोट होण्याची कारणे