पुणे – शहरातील मोहोळ- शेलार टोळी दादागिरी काही कमी नाही. यातच कुख्यात गुन्हेगार(crime) विठ्ठल शेलार याने शरद मोहोळ टोळीच्या एका सदस्याला पिस्तूल दाखवून धमकी दिली. त्यानंतर मोहोळ टोळीच्या सदस्यांनीदेखील शेलार टोळीवर तुफान दगडफेक करीत हल्ला चढवत त्यांच्या वाहनांच्या काचाही फोडल्याची घटना नुकतीच घडली होती. याप्रकरणाची दाखल पोलिसांनी घटनेच्या दिवशीच शेलार टोळीवर गुन्हा दाखल केला . मात्र त्यानंतर आता मोहळ टोळीवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर मोहोळ टोळीतील हागवणे याने हिंजवडी पोलिस (Hinjewadi Police) ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, टोळीप्रमुख विठ्ठल शेलार याच्यासह त्याच्या साथीदारावर गुन्हा दाखल केला होता. मात्र, मोहोळ टोळीवर काहीच कारवाई केली नव्हती. पोलिस (Police) उपनिरीक्षक समाधान कदम यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
तर झालं असं की..
मोहोळ टोळीचा सिद्धेश बाळू हागवणे (रा. म्हाळुंगे) हा बांधकाम साईटवर मटेरियल सप्लायचा व्यवसाय करतो. दरम्यान, त्याचा वाद विठ्ठल शेलार टोळीच्या एका सदस्याशी झाला होता. या वादातून त्यामुळे विठ्ठल शेलार याने म्हाळुंगे येथे हागवणे याच्या घराजवळ जाऊन त्याला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. तसेच, पिस्तूल दाखवून उद्या तुझ्या अंत्यविधीसाठी नातेवाईक बोलावून ठेव, अशी धमकी दिली. विठ्ठल शेलारच्या या कृत्यामुळे चिडलेल्या शरद मोहोळ टोळीच्या हस्तकांनी विरोधक विठ्ठल शेलार टोळीतील सदस्यांच्या गाडीवर दगड व कुंड्या फेकून हल्ला चढवला. तसेच, यामध्ये शेलार टोळीतील सदस्यांच्या वाहनांच्या काचा फुटल्या. मोहोळ टोळी आक्रमक झाल्याने परिसरात दहशत निर्माण झाली होती. या घटनेनंतर मोहोळ टोळीतील हागवणे याने हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, टोळीप्रमुख विठ्ठल शेलार याच्यासह त्याच्या साथीदारावर गुन्हा दाखल केला होता. मात्र, मोहोळ टोळीवर काहीच कारवाई केली नव्हती. पोलिस उपनिरीक्षक समाधान कदम यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, शरद हिरामण मोहोळ (रा. कोथरूड), आलोक शिवाजी भालेराव (रा. वडाची वाडी, पौड रोड, कोथरूड)मल्हारी मसुगडे (रा. माळवाडी, पुनावळे), सिद्धेश बाहू हगवणे (30, रा. म्हाळुंगे, पुणे) आणि पाच ते सहा अनोळखी इसम (नाव पत्ता माहिती नाही) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, यापूर्वी सिद्धेश बाळू हागवणे (30, रा. म्हाळुंगे) याच्या फिर्यादीनुसार विठ्ठल शेलार आणि त्याच्या इतर साथीदारांवर गुन्हा नोंद आहे.
Leopard death | जुन्नरमधील शेतात मृत अवस्थेत आढळला बिबट्या.. ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
गाळपाअभावी शिल्लक ऊसाला जबाबदार कोण..! साखर आयुक्तांच्या पत्रामुळे लागणार का प्रश्न मार्गी?