पुणे : मान्सूनने केरळमध्ये 8 जून रोजी हजेरी लावली आहे. त्यानंतर मान्सूनने आपली पुढील वाटचाल सुरु केली आहे. आता मान्सून कर्नाटकमध्ये दाखल झाला आहे. त्याचवेळी दुसरीकडे बिपरजॉय चक्रीवादळ अजून अरबी समुद्रात आहे. १४ जूनपर्यंत हे वादळ कायम राहणार आहे. यामुळे किनारपट्टीवरील भागात पाऊस पडणार नाही. या वादळाचा परिणाम कोकण किनारपट्टीवर होणार आहे. मात्र मुंबईला त्याचा धोका नाही. या वादळामुळे मुंबई, पालघर, कोकण किनारपट्टी अलर्ट जारी केला आहे.
महाराष्ट्रात कधी येणार मान्सून
केरळमध्ये ८ जून रोजी दाखल झालेला मान्सून महाराष्ट्रात कधी येणार? याची वाट सर्वच जण पाहत आहेत. भारतीय हवामान विभागाने मान्सूनची प्रगती पाहून राज्यात कधी येणार? याचे उत्तर दिले आहे. पुढील दोन दिवसांत मान्सून महाराष्ट्रात दाखल होणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. 48 तासांत गोव्यासह महाराष्ट्राच्या काही भागात मान्सून दाखल होणार आहे. दरम्यान पेरणीसाठी आवश्यक पावसासाठी आणखीन 10 दिवसांची प्रतीक्षा असणार आहे. यामुळे शेतकऱ्यांनी सध्या पेरणीची घाई करु नये, असा सल्ला पुणे वेधशाळेने दिला आहे.
उपग्रह छायाचित्र ११.४५ रात्री, चक्रिवादळाच्या सावटाखालीही, #केरळ, #कर्नाटक, #गोवा व #तळकोकणातील किनारपट्टीच्या भागात ढगांची दाटी होताना दिसत आहे. परिस्थिती मान्सुनसाठी अनुकुल होत आहे. pic.twitter.com/UC7KiaCzhD
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) June 10, 2023
मान्सूनचे काय आहेत निकष
रत्नागिरीत पाऊस
रत्नागिरी शहरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. रविवारी सकाळी रत्नागिरीत जोरदार पाऊस झाला. कोकणात मान्सून पूर्व पावसाच्या सरींचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. बिपरजॉय चक्रीवादळामुळे किनारपट्टी भागात आणखीन दोन दिवस पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.