पुणे : भारतीय हवामान विभागाकडून नियमित हवामानाचा अंदाज दिला जातो. पावसाळा सुरु होण्यापूर्वी एप्रिल महिन्यात मान्सूनचा पहिला अंदाज येतो. त्यानंतर मे महिन्यात दुसरा अन् दीघकालीन अंदाज येतो. हवामान विभागाने मान्सूनचा दीर्घकालीन अंदाज व्यक्त केला आहे. नैऋत्य मोसमी मोसमी पाऊस हा देशात सामान्य राहणार आहे. आपल्याकडील शेती पावसावर आधारित आहे. यामुळे यंदा 94-106%) असण्याची शक्यता आहे.
एल निनोचा प्रभाव
मान्सूनवर परिणाम करणारा एल निनोचा प्रभाव राहणार असल्याचे हवामान विभागाने यापूर्वी जाहीर केले होते. परंतु यासोबत द्विधृव हा घटक आहे. त्याचा प्रभाव असल्यामुळे मान्सून सामान्य होणार आहे. देशात ९६ ते १०४ टक्के पाऊस होणार आहे. या अंदाजामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
पण उशीराने येणार मान्सून
मान्सून यंदा सामान्य असला तरी उशीराने दाखल होणार आहे. सध्या मान्सून अंदमानच्या सागरात आहे. बंगालच्या उपसागराकडे त्याची प्रगती होत आहे. केरळमध्ये १ ऐवजी ४ जून रोजी मान्सून दाखल होणार आहे.
एल निनोचा प्रभाव
एल निनो म्हणजे कमी पाऊस असे असले तरी एल निनोच्या अनेक वर्षांत चांगला पाऊस झाला आहे. देशात यापूर्वी 2018 मध्ये अल नीनो (El Nino) चा प्रभाव दिसला होता. त्यानंतर 2019, 2020, 2021 आणि 2022 अशी सलग चार वर्षे चांगला पाऊस झाला. यंदा जूनमध्ये देशातील काही भागात सामान्यापेक्षा जास्त पाऊस असणार आहे. जूनमध्ये दक्षिण भारतातील काही भाग, वायव्य भारत, अतिउत्तर भारत आणि ईशान्य भारतातील काही भाग जेथे सामान्यपेक्षा जास्त पाऊस अपेक्षित आहे. तसेच देशातील बहुतांश भागांमध्ये सामान्यपेक्षा कमी पाऊस असणार आहे.
संपूर्ण देशभरात नैऋत्य मोसमात म्हणजे जून ते सप्टेंबर दरम्यान पाऊस सामान्य असण्याची शक्यता आहे. दीर्घ कालावधीच्या सरासरीच्या अंदाजानुसार चारी महिन्यात 96 ते 104% पाऊस असणार आहे.
किती वेळा अल निनोचा प्रभाव
2001 ते 2020 या कालावधीत भारताने सात वेळा अल निनोचा प्रभाव पाहिला आहे. अल निनोमुळे 2003, 2005, 2009-10, 2015-16 यामध्ये अनुक्रमे 16 टक्के, 8 टक्के, 10 टक्के आणि 3 टक्के खरीप किंवा रब्बीच्या उत्पादनात घट झाली होती. त्यामुळे महागाई वाढली. खरीप पिकांचा देशाच्या वार्षिक अन्न पुरवठ्यापैकी निम्मा वाटा आहे.
महागाईवर काय परिणाम
केरळमधील कोट्टायम केंद्राचे संचालक डी शिवानंद पै म्हणाले की, हिंदी महासागरातील दोन ठिकाणांमधला (पश्चिम आणि पूर्व) तापमानाचा फरक आहे. 2009 मध्ये, जेव्हा देशाला तीन दशकांतील सर्वात भीषण दुष्काळाचा फटका बसला होता, तेव्हा देशाने 2007 च्या तुलनेत दशलक्ष टन अधिक अन्नधान्य उत्पादन केले. त्यामुळे दुष्काळ पूर्वीसारखे संकट राहिले नाही. परंतु दुष्काळामुळे महागाई वाढते, शेतीचे उत्पन्न कमी करतो आणि अर्थव्यवस्थेला फटका बसतो.
दिल्लीत पाऊस
दिल्लीत शनिवारी पावसाला सुरुवात झाली आहे. सकाळपासून दिल्लीत पावसाची जोरदार हजेरी पाहायला मिळत आहे.
हे ही वाचा
Weather : पुणे शहराला ९०० कोटींचे काय मिळणार, ज्यामुळे हवामानाचा बिनचूक अंदाज होणार