पुणे, नवी दिल्ली | 20 ऑक्टोंबर 2023 : गेली चार वर्ष सामान्य आणि सामान्यपेक्षा जास्त पाऊस देशभरात झाला होता. परंतु यंदा उशिराने दाखल झालेला मॉन्सून चिंता निर्माण करुन गेला. राज्यात आणि देशात यंदा मॉन्सून उशिराने आला. त्यानंतर पावसाचा मोठा खंड पडला. ऑगस्ट महिना वगळता राज्यात चांगला पाऊस झाला नाही. यामुळे सर्व अपेक्षा परतीच्या पावसावर होती. परंतु परतीचा पाऊस चांगला झाला नाही. यामुळे यंदा चिंता निर्माण करणारी परिस्थिती असणार आहे. पावसाच्या या तुटीचा परिणाम शेती आणि पिण्याच्या पाण्यावर होणार आहे. पुन्हा पुढच्या वर्षीच आता मॉन्सून भेटणार आहे.
यंदा पाऊस सरासरीपेक्षा कमी झाला आहे. देशभरात मॉन्सूनवर अल निनोचा प्रभाव होता. देशात पावसाची सरासरी ८६८.६ मिमी आहे. परंतु यंदा ८२० मिमीच पाऊस झाला. २०२३ च्या चार वर्षांपूर्वी चांगला पाऊस झालेला होता. सामान्य आणि सामान्यपेक्षा चांगला पाऊस या चार वर्षांत झाला. परंतु आता सामान्यपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे अनेक भागांत पाण्याची टंचाई जाणावणार आहे. तसेच कमी पावसाचा परिणाम यंदा रब्बी हंगामावर होणार आहे.
देशभरातून मान्सून परतल्याची घोषणा हवामान विभागाने केली आहे. यंदाच्या पावसावर अल निनोचा प्रभाव असल्यामुळे कमी पाऊस झाला. दरवर्षी १५ ऑक्टोबर रोजी परतणारा पाऊस यंदा १९ ऑक्टोबर रोजी देशातून परतला आहे. त्यानंतर परतीच्या पावसाने राज्यात आणि देशात दिलासा दिलेला नाही. यंदा राज्यातील अनेक प्रकल्प पूर्णपणे भरलेले नाही. यामुळे उन्हाळ्यात पाण्याचे नियोजन करणे अवघड होणार आहे.
महाराष्ट्रात पावसाची मोठी तूट राहिली आहे. यंदा राज्यात पावसाचे प्रमाण ११.४ टक्के कमी राहिले आहे. कोकण वगळता इतर ठिकाणी परतीचा पाऊस झाला नाही. राज्यात सरासरीच्या ८८.६ टक्केच पाऊस झाला आहे. सामान्यपणे ९६ टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झाला तर हा पाऊस सरासरी इतका समजला जातो. परंतु यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिले आहे.