Pune Rain | पुणे जिल्ह्यातून मान्सूनची माघार कधी? आयएमडीने दिले अपडेट

| Updated on: Oct 06, 2023 | 7:56 AM

Rain Update | महाराष्ट्रात यावर्षी मान्सून उशिराने दाखल झाला. आता राज्यातून आणि पुणे जिल्ह्यातून मान्सून परतीचा प्रवास कधी असणार आहे, याची माहिती पुणे हवामान विभागाने दिली आहे. यंदा पुणे जिल्ह्यात पावसाची तूट किती होती...

Pune Rain | पुणे जिल्ह्यातून मान्सूनची माघार कधी? आयएमडीने दिले अपडेट
Rain
Follow us on

पुणे | 6 ऑक्टोंबर 2023 : राज्यात यंदा मान्सून उशिरानेच दाखल झाला. त्यानंतर पावसाने मोठा खंड पाडला. त्यामुळे यंदा राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाची सरसरी गाठली गेली नाही. पुणे जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. सप्टेंबर महिन्यात झालेल्या पावसामुळे पुणे परिसरातील धरणे भरली आहेत. आता पुणे परिसरातून पाऊस कधीपासून परणार आहे? त्याची माहिती पुणे हवामान विभागाने दिली आहे. देशातही मान्सूनचा हंगाम संपला आहे. तसेच अनेक राज्यात परतीचा पाऊस सुरु झाला आहे.

कधीपासून परतीची पाऊस

पुणे जिल्ह्यातून आगामी दोन दिवसांत पाऊस परतणार आहे. तसेच राज्यातून आजपासून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु झाला असल्याचे पुणे हवामान विभागाचे प्रमुख डॉ.अनुपम काश्यपी यांनी म्हटले आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेला कमी दाबाच्या पट्यामुळे पुणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पाऊस होत होता. आता बंगालच्या उपसागरात बदल झाला असून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु झाला आहे.

पुणे जिल्ह्यात पावसाची तूट

पुणे शहर व जिल्ह्यात यंदा पावसाची तूट होती. मान्सूनच्या चार महिन्यांत आतापर्यंत ६८४.१ मिलिमीटर पाऊस पुणे जिल्ह्यात झाला आहे. पावसाचे हे प्रमाण वार्षिक सरासरीच्या तुलनेत केवळ ७८.९ टक्के आहे. यामुळे यंदा मान्सून सामान्य असणार? त्यावर अल निनोचा प्रभाव नसेल? हा हवामान विभागाचा अंदाज चुकला आहे. मागील वर्षी पुणे जिल्ह्यात १०४७.५ मिलिमीटर पाऊस झाला होता. म्हणजेच या वर्षी ३६३.४ मिलिमीटर पाऊस कमी झाला आहे.

हे सुद्धा वाचा

या तालुक्यांनी गाठली सरासरी

यंदाच्या पावसाळ्यात पुणे जिल्ह्यातील काही तालुक्यात पावसाने सरासरी गाठली आहे. मावळ, भोर, आंबेगाव आणि खेड तालुक्यात सरासरीहून अधिक पाऊस पडला आहे. तसेच जुन्नर आणि वेल्हे या तालुक्यांमध्ये जवळपास सरासरी इतका पाऊस झाला आहे. इतर ठिकाणी मात्र पावसाची तूट झाली आहे. पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा जलसाठा झाला आहे. यामुळे पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली आहे.