पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेसंदर्भात नवीन आरोप होत आहे. राज्य सेवा आयोगाची परीक्षा ३० एप्रिलला होणार आहे. मात्र या परीक्षेची प्रवेशपत्रे सोशल मीडियावर फिरत आहे. यामुळे राज्य सेवा आयोगाच्या परीक्षेला बसलेल्या सुमारे पाच लाख विद्यार्थ्यांपैकी 93 हजार विद्यार्थ्यांचे परीक्षा प्रवेश पत्र लिक झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. तसेच डेटा लीक झाल्याचा व परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा केला जात आहे. आता MPSCकडून या संदर्भात खुलासा आला आहे.
काय आहे प्रकरण
एमपीएससीची राज्य सेवा आयोगाची परीक्षा 30 एप्रिलला होणार आहे. या परीक्षेला बसलेल्या सुमारे पाच लाख विद्यार्थ्यांपैकी 93 हजार विद्यार्थ्यांचे परीक्षा प्रवेश पत्र लिक झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.
30 तारखेला पेपर असताना 93 हजार हॉल तिकीट लिक झाले आहेत. आमची गोपनीय माहिती mpsc कडून लिक झाल्याचा दावा विद्यार्थी करत आहे.
कुठे मिळाला डाटा
एमपीएससीची राज्य सेवा आयोगाची परीक्षा 30 तारखेचा आहे. यातील प्रवेशपत्र टेलीग्राम चॅनलकडे उपलब्ध असल्याचा धक्कादायक आरोप विद्यार्थ्यांने केला आहे. या प्रकरणी परीक्षा घेणाऱ्या कंपनीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या या भोंगळ कारभाराविरोधात विद्यार्थी आक्रमक झाले आहे. यापूर्वी पुण्यात जुना अभ्यासक्रम लागू करण्याच्या
एमपीएससीचा खुलासा
परीक्षेची प्रवेशपत्रे संकेतस्थळावर आहेत. परंतु तात्पुरत्या बाह्यलिंकद्वारे ती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. ही प्रवेशपत्रे सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामुळे बाह्यलिंकद्वारे प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्याची सुविधा बंद केली असल्याचे एमपीएससीने म्हटले आहे. समाजमाध्यमात प्रसिद्ध झालेली प्रवेशप्रमाणपत्रे वगळता उमेदवारांचा कोणताही अन्य डेटा लिक झालेला नाही. प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा खोटा आहेस, असे एमपीएससीने स्पष्ट केले.
कारवाई होणार
एमपीएससी आयोगाकडून हॉलतिकीट व्हायरल प्रकरणात कारवाई केली जाणार आहे. आयोगाकडून हॉलतिकीट व्हायरल प्रकरणाची चौकशी केली जाणार आहे. तसेच या प्रकरणात लवकरच गुन्हा दाखल होणार आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांची टीव्ही 9 मराठीला दिली.