दहावीचा निकाल 2023 महाराष्ट्र बोर्ड : इयत्ता दहावीचा निकाल आज; विद्यार्थ्यांनो निकाल कुठे चेक कराल?; जाणून घ्या पटापट

| Updated on: Jun 02, 2023 | 1:26 PM

Maharashtra Board SSC 10th Result 2023 Declared : इयत्ता बारावीचा निकाल लागल्यानंतर सर्वांचंच लक्ष लागलेल्या इयत्ता दहावीचा निकाल आज लागणार आहे. आज शुक्रवारी सकाळी 11 वाजता पत्रकार परिषदेत निकाल जाहीर केला जाईल.

दहावीचा निकाल 2023 महाराष्ट्र बोर्ड : इयत्ता दहावीचा निकाल आज; विद्यार्थ्यांनो निकाल कुठे चेक कराल?; जाणून घ्या पटापट
MSBSHSE 10th Result
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

पुणे : इयत्ता बारावीचा निकाल लागल्यानंतर सर्वांचंच लक्ष लागलेल्या इयत्ता दहावीचा निकाल आज लागणार आहे. आज शुक्रवारी सकाळी 11 वाजता पत्रकार परिषदेत निकाल जाहीर केला जाईल. यावेळी शिक्षण विभागाकडून राज्यातील निकालाची टक्केवारी जाहीर केली जाईल. तसेच किती विद्यार्थी आणि विद्यार्थीनी उत्तीर्ण झाले? राज्याचा एकूण निकाल किती लागला? परिमंडळ निहाय निकाल किती लागला? याची माहिती शिक्षण विभागाकडून दिली जाईल. त्यानंतर दुपारी 1 वाजता ऑनलाईन निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे या निकालाकडे राज्यभरातील विद्यार्थी आणि त्यांच्या पालकाचं लक्ष लागलं आहे.

राज्यात 15,77,256 विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावीची परीक्षा दिली होती. ही परीक्षा राज्यभरातील 5033 परीक्षा केंद्रावर पार पडली होती. यावर्षी 2 मार्चपासून ते 25 मार्चपर्यंत परीक्षा चालली होती. गेल्याच आठवड्यात शिक्षण विभागाने इयत्ता बारावीचा निकाल जाहीर केला होता. त्यामुळे इयत्ता दहावीच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. हा निकाल कधी लागणार? असा सवाल केला जात होता. तर निकाल केव्हाही लागेल असा अंदाज विद्यार्थ्यांना होता. विद्यार्थ्यांचा हा अंदाज बरोबर ठरला आहे. उद्या शुक्रवारी परीक्षेचा निकाल लागणार असल्याचं शिक्षण विभागाने स्पष्ट केल्याने विद्यार्थ्यांचा जीव भांड्यात पडला आहे.

हे सुद्धा वाचा

निकाल कुठे चेक कराल?

mahresult.nic.in

sscresult.mkcl.org

ssc.mahresults.org.in

असा करा निकाल चेक

इयत्ता दहावीचा निकाल पाहण्यासाठी शिक्षण विभागाच्या mahresult.nic.in या अधिकृत संकेस्थळाला भेट द्या.

त्यानंतर संकेतस्थळाच्या होमपेजवर Maharashtra Examination 2023 – RESULT च्या लिंकवर क्लिक करा

त्यानंतर SSC Examination February- 2023 RESULT लिंकवर क्लिक करा

त्यानंतर पुढच्या पानावर Roll Number आणि आईचं नाव टाका

निकाल लगेच स्क्रिनवर दिसेल

मार्कशीट चेक केल्यानंतर प्रिंट घ्या