पुणे | 18 सप्टेंबर 2023 : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम वेगाने सुरु आहे. या मार्गावरील काही स्टेशन काम झाले. मुंबईत अंडरगाऊंड स्टेशन तयार केले जात आहे. या मार्गावर असलेल्या पुलांचे काम सुरु आहे. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या मार्गावर एकूण 24 पूल असून त्यातील 20 पूल गुजरातमध्ये तर 4 पूल महाराष्ट्रात तयार केले जात आहे. या मार्गात असणाऱ्या सर्व अडचणी दूर झाल्या आहेत. त्याचवेळी नवीन रेल्वे मार्गाची चाचपणी सुरु झाली आहे.
मुंबई, अहमदाबादनंतर देशातील सात मार्गावर बुलेट ट्रेन सुरु करण्याचा प्रस्ताव तयार केला जात आहे. त्यात मुंबई, हैदराबादचा 709 किलोमीटर बुलेट ट्रेनचा समावेश आहे. यासंदर्भातील सविस्तर प्रकल्प अहवाल दाखल झालेला आहे. भारताच्या नॅशनल रेल प्लॅनने म्हणजेच NRP हाय-स्पीड ट्रेनसाठी नवीन मार्ग शोधले आहे. एकूण सात मार्गांसंदर्भात चर्चा सुरु आहे. यानंतर देशाच्या रेल्वे नेटवर्कमध्ये क्रांतिकारी बदल होणार आहे. मुंबई-हैदराबाद बुलेट ट्रेनमुळे मुंबई आणि बेंगळुरू जोडले जाणार आहे.
मुंबई, हैदराबाद हायस्पीड रेलमार्गावर पुणे स्टेशन असणार आहे. हा मार्ग मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, नवी मुंबई, लोणावळा, पुणे, दौंड, अकलूज, पंढरपूर, सोलापूर, कलबुर्गी या मार्ग हैदराबादमध्ये जाणार आहे. या रेल्वेचा कमाल वेग 350 किमी प्रतितास असणार आहे. सर्व काही सुरळीत झाले तर 2041 मध्ये या मार्गावर बुलेट ट्रेन धावण्याची शक्यता आहे. रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव यांनी लोकसभेत या मार्गासंदर्भात माहिती दिली होती.
सध्या सेमी हायस्पीड ट्रेन म्हणून ओळखली जाणारी वंदे भारत ट्रेन पुणे शहरातून जात आहे. मुंबई-सोलापूर असलेल्या या ट्रेनला पुणे स्थानकावर थांबा दिल्या आहेत. पुणेकरांकडून या ट्रेनला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आता त्यानंतर बुलेट ट्रेन सुरु झाल्यास पुणेकरांना त्यांचा चांगलाच फायदा होणार आहे. तोपर्यंत पुणे येथील पुरंदर नवीन विमानतळ सुरु होण्याची शक्यता आहे.