मावळ,पुणे : मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर दररोज हजारो प्रवासी प्रवास करत असतात. परंतु येत्या 1 एप्रिलापासून या प्रवाशांना जास्त दर देऊन प्रवास करावा लागणार आहे. कारण आता मुंबई पुणे एक्सप्रेस वे च्या टोल दरात वाढ करण्यात आली आहे. 2004 ला हा टोल सुरू करताना दर तीन वर्षांनी 18% दरवाढ करण्याचे ठरले होते. त्यानुसार आता टोलच्या दरात 18 टक्के वाढ एप्रिल 2023 पासून करण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. त्यामुळे या महामार्गावरुन जातात आता वाढीव टोल देऊन प्रवास करावा लागणार आहे. या दरवाढीबाबत वाहन धारकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मुंबई पुणे एक्सप्रेस वे मार्गाच्या टोल मध्ये दर तीन वर्षांनी 18 टक्के वाढ करण्याची अधिसूचना काढण्यात आली होती. त्यानुसार एप्रिल 2023 मध्ये टोलच्या दरात वाढ करण्याचा निर्णय टोल प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. 2004 ला हा टोल सुरू करताना दर तीन वर्षांनी 18% दरवाढ करण्याचे ठरले होते. मात्र यामागचं गृहीतक होतं की या रस्त्यावरील ट्रॅफिक दरवर्षी 5% ने वाढेल. 2004 ते 2019 या काळात या हिशोबाने कंत्राटदाराला 2869 कोटी रुपये मिळणार असे गृहीत धरून कंत्राट केले गेले. परंतु त्यापेक्षा जास्त निधी कंत्राटदाराला मिळाला.
नवीन कंत्राट 2020 मध्ये झाले होते. त्यावेळी या सर्व बाबी विचारात घेऊन कंत्राट करणे आवश्यक होते. परंतु कंत्राट दहा वर्षांचे केले असल्याने आता त्यात बदल करणे शक्य नाही, असे सांगून शासन आणि प्रशासनाकडून दरवाढीचे समर्थन केले गेले.
किती वाढले दर
चार चाकी वाहन
सध्याचे दर 270
एप्रिल 2023 पासून नवीन दर 320
टेम्पो
सध्याचे दर 430
एप्रिल 2023 पासून नवीन दर 495
ट्रक
सध्याचे दर 580
एप्रिल 2023 पासून नवीन दर 685
बस
सध्याचे दर-797
एप्रिल 2023 पासून नवीन दर 940
थ्री एक्सल वाहन
सध्याचे दर-1380
एप्रिल 2023 पासून नवीन दर 1630
एम एक्सल वाहन
सध्याचे दर-1835
एप्रिल 2023 पासून नवीन दर 2165
मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर 18 टक्के टोल दरवाढ ही अत्यंत चुकीची आणि अन्यायकारक (Mumbai Pune Express Way Toll rate Increases) आहे, असे वाहन धारकांकडून म्हटले जात आहे.
खेड शिवापूर टोलबाबत मोठा निर्णय, कोण जिंकले? प्रशासक की आंदोलक?…वाचा सविस्तर