पुणे-मुंबई प्रवास होणार फास्ट, ट्रान्स-हार्बर लिंक पुणे एक्स्प्रेसला जोडणार, किती वेळ वाचणार

| Updated on: Mar 16, 2023 | 11:50 AM

कॉरिडॉरच्या उभारणीमुळे लोणावळा, खंडाळा आणि मुंबईदरम्यानच्या प्रवासासाठी ९० मिनिटांची बचत होणार आहे. मुंबई ट्रान्स-हार्बर लिंकसाठी चिर्ले येथे इंटरचेंज असेल.

पुणे-मुंबई प्रवास होणार फास्ट, ट्रान्स-हार्बर लिंक पुणे एक्स्प्रेसला जोडणार, किती वेळ वाचणार
मुंबई ट्रान्स-हार्बर लिंक
Image Credit source: टीव्ही९ नेटवर्क
Follow us on

पुणे : मुंबई ट्रान्स-हार्बर लिंक (MTHL) हा राज्यातील सर्वात महत्वकांक्षी प्रकल्प. देशातील सर्वात मोठा सागरी पूल म्हणजे हा प्रकल्प आहे. आता एलिव्हेटेड कॉरिडॉरद्वारे ट्रान्स-हार्वर लिंक मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेला जोडला जाणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (MMRDA) अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. मुंबईतील या मेगा प्रोजेक्टसाठी MMRDAने निविदा मागवल्या आहेत. या प्रकल्पाची किंमत 1000 कोटी रुपये आहे. या प्रकल्पामुळे अनेक रस्त्यांवरील रहदारी कमी होण्याची अपेक्षा आहे, या सागरी सेतूमुळे हजारो प्रवाशांना मुंबई, नवी मुंबई, लोणावळा, पुणे आणि इतर अनेक ठिकाणी जाण्यास मदत होईल.

या कॉरिडॉरच्या उभारणीमुळे लोणावळा, खंडाळा आणि मुंबईदरम्यानच्या प्रवासासाठी ९० मिनिटांची बचत होणार असल्याची माहिती एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी दिली. त्याचा चिर्ले येथे इंटरचेंज असेल. मुंबई ट्रान्स-हार्बर लिंक (MTHL) चे बांधकाम पूर्णत्वाकडे आहे. डिसेंबर 2023 पर्यंत हा लिंक रोड सुरु होणार आहे.

दरम्यान, बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) ईस्टर्न फ्रीवेला ग्रँट रोडशी जोडण्यासाठी आणखी एक उन्नत रस्ता जोडण्याचे काम करणार आहे. एका अंदाजानुसार यासाठी 700 कोटी रुपये खर्च येणार आहे. हा उन्नत रस्ता ईस्टर्न फ्रीवे (ऑरेंज गेट) ते फ्रेरे ब्रिज पूर्वेला जे राठौर रोड, हँकॉक ब्रिज, रामचंद्र भट्ट मार्ग (जेजे फ्लायओव्हरवर) आणि मौलाना शौकत अली रोडवरून जोडला जाणार आहे.

हे सुद्धा वाचा

हार्बल लिंक आहे कसा

MMRDA रायगडमधील शिवडी आणि न्हावा-शेवा दरम्यान 22 किमी लांबीचा मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (MTHL) पुल बांधत आहे. हा भारतातील सर्वात लांब सागरी पुल आहे. या पुलाचे जवळपास 90 टक्के काम पूर्ण झाले आहे.

प्रदीर्घ काळ प्रलंबित असलेला 21.8 किमी मुंबई ट्रान्स-हार्बर लिंक शिवडी ते मुंबई आणि रायगड ते न्हावा शेवा यांना जोडला जाणार आहे. हा 6 लेन फ्री वे ग्रेड ब्रिज आहे. त्याच्या 21.8 किमीपैकी 16.5 किमी समुद्रमार्गे आहे. तर 5.5 किमी अंतर जमिनीवर आहे. त्याचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर, हा भारतातील सर्वात लांब सागरी पूल असणार आहे. त्यावरुन दररोज 7000 वाहने जातील.

काय होणार बदल

ट्रान्स-हार्बर लिंक (MTHL) प्रकल्पानंतर मुंबई ‘बेट शहर’ राहणार नाही. कारण मुंबईला जोडणारी अखंड कनेक्टिव्हिटी असणार आहे. त्यामुळे या बेट शहराचे 200 वर्षांपासूनचे अडथळे संपणार आहे.

मुंबईचा कायापालट होणार, तज्ज्ञांनी सांगितलेले व्हिजच वाचा