Pimpri Chinchwad crime : आठ वर्षाच्या चिमुरड्याच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू घालून खून! पिंपरी चिंचवडच्या चिखलीतली हृदयद्रावक घटना

| Updated on: Apr 18, 2022 | 11:42 AM

चिखलीत (Chikhali) आठ वर्षीय मुलाच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू घालून खून (Murder) करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. रात्री उशिरा ही घटना समोर आली आहे. आठ वर्षीय मुलाच्या पालकांनी चिखली पोलिसात (Police) तो बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती.

Pimpri Chinchwad crime : आठ वर्षाच्या चिमुरड्याच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू घालून खून! पिंपरी चिंचवडच्या चिखलीतली हृदयद्रावक घटना
Image Credit source: tv9
Follow us on

पिंपरी चिंचवड : चिखलीत (Chikhali) आठ वर्षीय मुलाच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू घालून खून (Murder) करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. रात्री उशिरा ही घटना समोर आली आहे. आठ वर्षीय मुलाच्या पालकांनी चिखली पोलिसात (Police) तो बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती. लक्ष्मण देवासी असे आठ वर्षीय मुलाचे नाव आहे. रविवारी दुपारपासून तो बेपत्ता झाला होता. त्याचा आई-वडिलांनी शोध घेतला, पण तो सापडला नाही. अखेर चिखली पोलीस ठाणे गाठून रात्री सातच्या सुमारास तो बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. पोलीस आणि कुटुंबीय त्याचा शोध घेत होते. तेव्हा त्याच्या घराच्या शंभर मीटर अंतरावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या लक्ष्मणचा मृतदेह आढळला. त्याचा अज्ञात व्यक्तीने सिमेंटचा गट्टू घालून खून केला असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, याप्रकरणी चिखली पोलीस अधिक तपास करत असून खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आठ वर्षीय मुलगा काल अचानक गायब झाला. आई-वडिलांनी जवळ सर्वत्र शोध घेतला. मात्र सापडून आला नाही. शेवटी तक्रार दाखल करण्यात आली. त्यानुसार शोध घेतला असता या मुलाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात घराच्या जवळच पडलेला आढळून आला. अज्ञात व्यक्तीने हा प्रकार केल्याचे प्रथमदर्शनी दिसत असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आणखी वाचा :

Bhandara : पूर्ववैमनस्यातून तरुणाची धारदार हत्याराने वार करून हत्या, मुख्य आरोपी पोलिसांच्या ताब्यात

बातमी छापली म्हणून पत्रकाराला अश्लील शिविगाळ, जीवे मारण्याचीही धमकी! महाराष्ट्रात कुठे घडला प्रकार?

Nagpur Murder: अनैतिक संबंधात पतीचा अडसर! मुलीच्या मदतीनं पतीची गळा आवळून हत्या करत आत्महत्येचा कांगावा