कोल्हापूर: नांदेडमधील मराठा क्रांती मूक आंदोलनप्रकरणी 21 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांच्या या कारवाईवर खासदार संभाजी छत्रपती संतापले आहेत. गुन्हा दाखल करायचाच असेल तर माझ्यावर करा. सामान्य मराठा बांधवांच्यावरच गुन्हे दाखल का? असा सवाल संभाजी छत्रपती यांनी केला आहे. (nanded police lodge complaint against Maratha reservation protest rally workers)
संभाजी छत्रपती यांनी ट्विट करून ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. गुन्हा दाखल करायचाच असेल तर माझ्यावर करा. सामान्य गरीब मराठा बांधवांवर का? समाजाच्या प्रश्नांसाठी नांदेड येथे एकत्र आलेल्या मराठा बांधवांवर प्रशासनाने कोव्हिडचे कारण दाखवत गुन्हे दाखल केले आहेत. राजकीय पक्षांना वेगळा न्याय आणि मराठा समाजाला वेगळा न्याय, असे का?, असा सवाल संभाजी छत्रपती यांनी केला आहे.
काल 20 ऑगस्ट रोजी नांदेडमध्ये मराठा क्रांती मूक आंदोलन छत्रपती संभाजीराजे यांच्या प्रमुख उपस्थिती पार पडले. मराठा समाजाच्या मनातील खदखद दाखविण्यासाठी हजारोंच्या संख्येने मराठा समाजाने जमून एकी दाखवली. आरक्षणासह इतर प्रश्न सोडविण्यासाठी मराठा बांधव छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वात आक्रमक होताना दिसले. एकिकडे सर्व राजकीय पक्षांचे सभा, मेळावे, आंदोलन होत असताना मराठा क्रांती मोर्चा आंदोलकांवर गुन्हा दाखल झाल्याने संभाजी छत्रपती यांनी संताप व्यक्त केला आहे.
दरम्यान, मराठा मूक आंदोलन प्रकरणी 21 जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कोव्हिड काळात गर्दी जमवल्या प्रकरणी आयोजकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वजिराबाद पोलिस ठाण्यात हे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
मराठा मूक आंदोलनानंतर त्यावर अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी टीका केली होती. संभाजी छत्रपती यांनी गर्दी जमवून कोरोना नियामांचं उल्लंघन केल्याने आंदोलनाच्या आयोजकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी सदावर्ते यांनी केली होती. त्यानंतर हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. (nanded police lodge complaint against Maratha reservation protest rally workers)
गुन्हा दाखल करायचाच असेल तर माझ्यावर करा !
सामान्य गरीब मराठा बांधवांच्यावर का ?
समाजाच्या प्रश्नांसाठी नांदेड येथे एकत्र आलेल्या मराठा बांधवांवर प्रशासनाने कोविडचे कारण दाखवत गुन्हे दाखल केले आहेत.
राजकीय पक्षांना वेगळा न्याय आणि मराठा समाजाला वेगळा न्याय, असे का ? pic.twitter.com/y7uuqtA8Vq
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) August 21, 2021
संबंधित बातम्या:
त्याच दिवशी खासदारकी सोडणार होतो; खासदार संभाजी छत्रपतींचा मोठा गौप्यस्फोट
खासदार संभाजी छत्रपती आक्रमक; सरकारला पहिल्यांदाच दिलं खुलं आव्हान
गोपीनाथ मुंडे नसते तर पारावर हरिपाठ करत बसलो असतो: रावसाहेब दानवे
(nanded police lodge complaint against Maratha reservation protest rally workers)