संसदेत चांगली अ‍ॅक्टिंग केलीत, नवनीत राणांचं जात प्रमाणपत्र बनावट: रुपाली चाकणकर

| Updated on: Mar 23, 2021 | 3:20 PM

काल लोकसभेत महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी खासदार नवनीत राणा यांनी केली होती. | Rupali Chakankar Navneet Rana

संसदेत चांगली अ‍ॅक्टिंग केलीत, नवनीत राणांचं जात प्रमाणपत्र बनावट: रुपाली चाकणकर
नागपूर खंडपीठात हे प्रकरण सुरु आहे. नवनीत राणा यांनी जरा तिकडेही लक्ष द्यावे.
Follow us on

पुणे: परमबीर सिंह यांच्या पत्रावरून संसेदत महाविकासआघाडीला धारेवर धरणाऱ्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी आणखी एक पलटवार केला आहे. नवनीत राणा यांनी विधानसभा निवडणुकीवेळी सादर केलेली जातीची कागदपत्रे बनावट होती. त्यांनी विधानसभेची निवडणूक जिंकली असली तरी नागपूर खंडपीठात हे प्रकरण सुरु आहे. नवनीत राणा यांनी जरा तिकडेही लक्ष द्यावे, असे रुपाली चाकणकर यांनी म्हटले. (NCP Rupali Chakankar take a dig at Navneet Rana)

काल लोकसभेत महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी खासदार नवनीत राणा यांनी केली होती. काल संसदेत केलेलं भाषण हे एक अभिनयाचा उत्तम नमुना होता आणि तो तुम्ही करता, मात्र तुम्हाला जर एवढा पुळका असेल तर आधी राजीनामा द्यावा नंतर राष्ट्रपती राजवटीची मागणी करा अशी टीकाही चाकणकर यांनी केली.

‘पवारांच्या पाठिंब्याचा आदरच, पण राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून आले नाही’

मी राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून आली नाही, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार साहेबांनी मला समर्थन दिले त्याचा मी आदर करते. पण रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी मला सांगू नये कुणी राजीनामा द्यावा ते, अशा शब्दात अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत कौर राणा (Navneet Kaur Rana) यांनी प्रत्युत्तर दिले.

ज्यांना पाठिशी घालताय…. रुपाली चाकणकरांनी चित्रा वाघांना सुनावले खडे बोल

महाराष्ट्राचा स्वाभिमान असणाऱ्या राष्ट्रमाता जिजाऊ आणि क्रांतीज्योती सावित्रीमाई यांच्या नावाचा वापर करून तुम्ही ज्यांना पाठीशी घालत आहात त्यांना एकच प्रश्न विचारा चित्रा वाघ की, तुम्ही गेल्या वर्षभरात महाराष्ट्राच्या हक्काचा GST निधी मिळवण्यासाठी काय प्रयत्न केले, असे ट्विट रुपाली चाकणकर यांनी केले.

महाराष्ट्रात राहुन शासनाधिकृत मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत न करता अनधिकृत अशा PM Care Fund ला मदत केली जे आज हिशोब मागितला तरी द्यायला तयार नाहीत यापेक्षा मोठा महाराष्ट्रद्रोह होऊच शकत नाही, असेही रुपाली चाकणकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते.

संबंधित बातम्या:

पवारांच्या पाठिंब्याचा आदरच, पण राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून आले नाही, नवनीत राणांनी चाकणकरांना सुनावलं

ज्यांना पाठिशी घालताय…. रुपाली चाकणकरांनी चित्रा वाघांना सुनावले खडे बोल

आधी खासदारकीचा राजीनामा द्या आणि मग महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीच्या गप्पा करा, चाकणकर नवनीत राणांवर भडकल्या

(NCP Rupali Chakankar take a dig at Navneet Rana)