पुणे लोकसभेच्या जागेवरून काँग्रेस, राष्ट्रवादीत रस्सीखेच, आता काँग्रेसने केला बारामतीवर दावा

| Updated on: Apr 30, 2023 | 2:49 PM

baramati lok sabha : राष्ट्रवादी काँग्रेस पुणे लोकसभा मतदार संघावर दावा करत आहे. यामुळे काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेसला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला आहे. आता काँग्रेसने सरळ बारामती लोकसभा मतदार संघावर आपला दावा केला आहे.

पुणे लोकसभेच्या जागेवरून काँग्रेस, राष्ट्रवादीत रस्सीखेच, आता काँग्रेसने केला बारामतीवर दावा
Follow us on

योगेश बोरसे, पुणे : भाजपचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुणे लोकसभा पोटनिवडणुकीची चर्चा रंगली आहे. महाविकास आघाडीतून काँग्रेसने या जागेवर दावा केला आहे. काँग्रेसकडून कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर निवडणूक लढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसनेही आपला दावा केला आहे. यामुळे महाविकास आघाडीत पोटनिवडणुकीवरुन बिघाडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आता राष्ट्रवादीच्या दाव्यानंतर काँग्रेसने मोठी खेळी केली आहे. काँग्रेसने सरळ शरद पवार यांचा गड असणाऱ्या बारामती मतदार संघावर दावा केला आहे.

काय आहे काँग्रेसची मागणी

पुणे लोकसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसने मागितल्यानंतर आता काँग्रेसनेही बारामतीवर आपला दावा केला आहे. काँग्रेस सेवादलाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पवार यांची पत्राद्वारे बारामतीची जागा काँग्रेसला देण्याची केली मागणी केली आहे. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगतापांनी पुणे लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर आता काँग्रेस केला बारामती लोकसभा मतदारसंघावर दावा केला आहे.

हे सुद्धा वाचा

पुणे लोकसभेची जागा काँग्रेसने मोठ्या मनाने राष्ट्रवादी काँग्रेसला द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली ठोंबरे यांनी केली आहे. विधानसभेच्या वेळी आम्ही कसबा मतदारसंघ काँग्रेसला दिला. आता त्यांनी दिलदारपणा दाखवून लोकसभेची जागा आम्हाला द्यावी, अशी मागणी रुपाली पाटील यांनीही केली होती.

बारामती पवारांचा गड

पुणे जिल्ह्यामधील ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत. १९९१ पासून शरद पवार या मतदार संघातून निवडणूक लढवत आहे. त्यानंतर २००९ पासून सुप्रिया सुळे यांनी निवडणूक लढवण्यास सुरुवात केली. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने दावा केल्यामुळे पवार यांचा गड धोक्यात येणार आहे. यावरुन महाविकास आघाडीत बिघाडी होणार आहे.

भाजपची तयारी सुरु

लोकसभा पोटनिवडणूक लागण्याआधीच उमेदवारांच्या नावांची चर्चा सुरू झाली आहे, काँग्रेसकडून माजी आमदार मोहन जोशी आणि अरविंद शिंदे यांच्या नावाची चर्चा आहे. भाजपमधून एकूण पाच जणांच्या नावांची सध्या चर्चा आहे. माजी खासदार संजय काकडे, मुरलीधर मोहोळ, सिद्धार्थ शिरोळे आणि जगदीश मुळीक यांची नावे भाजपमधून चर्चेत आहेत. मात्र बापट यांची सून स्वरदा बापट यांना उमेदवारी देऊन भाजप निवडणूक बिनविरोध करण्याची शक्यता अधिक आहे.