भाजपमध्ये जाण्याच्या चर्चांवर अजित पवार यांचे मोठे वक्तव्य, ‘राज’ केले उघड

| Updated on: Apr 23, 2023 | 5:04 PM

Ajit Pawar : राजकारणात गेल्या काही दिवसांपासून अजित पवार यांच्याबाबत चर्चा रंगल्या आहेत. अजित पवार यांच्यांसोबत आमदारांचा एक गट भाजपत जाणार असल्याचे म्हटले जात आहे. त्यावर अजित पवार यांनी पुन्हा स्पष्टीकरण दिले आहे.

भाजपमध्ये जाण्याच्या चर्चांवर अजित पवार यांचे मोठे वक्तव्य, राज केले उघड
Image Credit source: tv9
Follow us on

नविद पठाण, बारामती, पुणे : गेल्या काही दिवसांपासून अजित पवार यांच्यासंदर्भात राजकारणात जोरदार चर्चा सुरु आहे. शरद पवार यांची साथ सोडून अजित पवार भारतीय जनता पक्षात जाणार असल्याचे म्हटले जात आहे. त्यावर शरद पवार आणि अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे. त्यानंतर माध्यमांमधील चर्चा थांबत नाही. पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री व्हायला आवडणार असल्याचे वक्तव्य अजित पवार यांनी केले. त्यानंतर पुन्हा ही चर्चा सुरु झाली. त्यावर आता अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

काय बोलले अजित पवार

एका हॉटेलच्या उद्घाटनाच्या निमित्ताने अजित पवार आले होते. त्यावेळी त्यांनी गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या चर्चांसंदर्भात स्पष्टपणे मत मांडले. अजित पवार म्हणाले की, 1967 पासून शरद पवार साहेबांवर बारामतीने विश्वास ठेवला आहे. शरद पवार साहेबांनी माझ्यावर 1990 पासून माझ्यावर विश्वास टाकला आहे. या विश्वासाला मी तडे जाऊ देणार नाही. कोणी काय डोक्यात वेगळा घालायचं प्रयत्न केला तर डोक्यात घेऊ नका, असे स्पष्ट ते भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांसंदर्भात स्पष्ट म्हणाले. बारामतीचं वातावरण सुरक्षित राहिलं पाहिजे, हे महत्वाचे आहे, असे अजित पवार यांनी म्हटलंय.

हे सुद्धा वाचा

मी आमदार असल्यामुळे अधिकाऱ्यांकडून काम करून घ्यायला सोपं जातं. पालखी मार्ग अतिशय मोठा झाला आहे. पुढचा राहिलेला आपण चारपदरी करतोय. बारामती शहराचा विकास वेगाने होत आहे. यामध्ये नवीन नवीन दुकानं येताय. बारामतीत वेगळी कन्सेप्ट तयार झाली आहे.

विकासासाठी निधी आणू

जे काही करता येईल ते आपण करु या. निधी आणायला मी खंबीर आहे. बारामतीकरांनी 67 पासून साहेबांवर विश्वास टाकला. त्या विश्वासाला तडे जाऊ देणार नाही

जमीन विकू नका

बारामतीचा विकास होत आहे. बारामतीकरांनी आपल्या जमिनी विकू नका, असा सल्ला अजित पवार यांनी दिला. बारामतीचा विकास होतानात लोकांनीही आपली जबाबदारी पाळली पाहिजे. इतरत्र कचरा टाकला नाही पाहिजे. विकास झाल्यामुळे जमिनीचा दर वाढत आहे. परंतु आपल्या जमिनी विकू नका.जेवढा नोकऱ्या देता येईल तेवढं करतो. छोटामोठा व्यवसाय केला पाहिजे. बाहेरून येऊन लोकं करतात मात्र बारामतीकरांना का जमतं नाही. जेवढं काही करता येईल ते मी रात्रंदिवस काम करतो, असे अजित पवार यांनी सांगितले.

हे ही वाचा

Video : तापमान वाढले अन् मुंबईतील AC लोकलची अशी कशी झाली अवस्था

Video | उन्हामुळे हैराण झालेल्या युवकाची भन्नाट आयडीया झाली व्हायरल