दोनच अपत्यांवर थांबा, देवाची कृपा.. देवाची कृपा… म्हणून उगी पलटण वाढवू नका; अजितदादांचा कुटुंबनियोजनाचा सल्ला

| Updated on: Jan 15, 2023 | 12:50 PM

मध्ये कुणीतरी तोडफोड केली. कोयता गँग का फोयता गँग. मला ते चालणार नाही. आपण परिवार म्हणून आधार देण्याचं काम करत असतो. काही वाटलं तर मला अधिकाराने सांगा.

दोनच अपत्यांवर थांबा, देवाची कृपा.. देवाची कृपा... म्हणून उगी पलटण वाढवू नका; अजितदादांचा कुटुंबनियोजनाचा सल्ला
Ajit Pawar
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

पुणे: राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी बारामतीकरांना आज कुटुंबनियोजनाचा मंत्र दिला आहे. आपल्या सूनेला आणि मुलीला केवळ दोन मुलांवरच थांबायला सांगा. दोन मुली झाल्या तरी तिसरं अपत्य ठेवू नका असं सांगा. पोरंगच पाहिजे, वंशाचा दिवा पाहिजे हा हट्ट धरू नका. मुलगी देखील कर्तबगार असते. शरद पवार साहेब तर एकाच मुलीवर थांबले. त्यामुळे उगाच देवाची कृपा… देवाची कृपा… असं म्हणून उगी पलटण वाढवू नका, असा सल्ला अजित पवार यांनी दिला. त्यामुळे उपस्थितांमध्ये एकच खसखस पिकली.

अजित पवार यांच्या हस्ते बारामतीत गरजू महिलांना स्वेटर, साडी आणि शिलाई मशिनचं वाटप करण्यात आलं. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी हे आवाहन केलं. जाता जाता एकच सांगतो, आवडो किंवा न आवडो.

हे सुद्धा वाचा

आपली सूनबाई आली किंवा मुलीचं लग्न झालं, तर तिला म्हणा दोन अपत्यावरच थांब, बाकी काही अजिबात वाढवा वाढवी करू नको, असं सांगा. दोन्ही मुली झाल्या तरी त्या सोन्यासारख्या आहेत हे पटवून द्या, असं अजित पवार म्हणाले.

आम्हाला कळना व्हयं कुणाची कृपा

आता शरद पवार साहेब एकट्या सुप्रियावरच थांबले की नाही? सुप्रिया साहेबांचंच नाव काढते की नाही? पोरगंच पाहिजे… वंशाचा दिवाच पाहिजे… कशाचं काय अन् कशाचं काय? मुलगी देखील कर्तबगार आहे. आम्ही अनुभवतो बाबांनो. त्यामुळे मर्यादित कुटुंब ठेवा, असं आवाहन अजितदादांनी केलं.

आम्हाला कळना व्हयं कुणाची कृपा

छोटं कुटुंब, सुखी कुटुंब. तुम्हालाही सर्व सुविधा मिळतील. नाही तर उगी पलटण चालूच आहे… चालूच आहे.. देवाची कृपा… देवाची कृपा…म्हणे देव वरनं देतोय… आम्हाला कळना व्हयं कुणाची कृपा आहे ती. तसं काही होऊ देऊ नका. गंमतीचा भाग जाऊ द्या. पण कुटुंब मर्यादित ठेवण्याची गोष्ट लक्षात घ्या, असं ते म्हणाले.

कुणाचेही लाड खपवून घेणार नाही

माझ्या बारामतीत कोणत्याही समाजाच्या व्यक्तीला सुरक्षित वाटले पाहिजेत. कुणाचेही लाड मी खपवून घेणार नाही. माझ्याजवळ बसणारा असेल आणि तो काही चुकत असेल तर त्याच्यावर कारवाई करा. कालही काही घटना घडली.

आधीही काही झालं. मी हे खपवून घेणार नाही. इथे प्रत्येकाला सुरक्षितच वाटले पाहिजे. अनेकजण चार पिढ्यांपासून आमच्यासोबत आहेत. कुणी चुकत असेल तर मी खपवून घेणार नाही. महिलाही सुरक्षित राहिल्या पाहिजेत, असं ते म्हणाले.

मला ते चालणार नाही

मध्ये कुणीतरी तोडफोड केली. कोयता गँग का फोयता गँग. मला ते चालणार नाही. आपण परिवार म्हणून आधार देण्याचं काम करत असतो. काही वाटलं तर मला अधिकाराने सांगा.

स्वच्छतेला महत्त्व द्या. झाडे लावतोय. झाडे तोडू नका. पाने तोडू नका. रस्त्याच्याकडेने मला चांगल्या दर्जाचीच खेळणी हवी. स्वच्छता जशी घरात ठेवता तशी शहरातही ठेवली पाहिजे, असं ते म्हणाले.