भूषण पाटील, कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या अडचणी वाढणार आहेत. गेल्या पंधरा दिवसांपुर्वी अंमलबजावणी संचालयाने कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेतील (Kolhapur District Bank) काही आजी माजी संचालकांची चौकशी केली होती. ईडीने (ed) जिल्हा बँकेतील पाच कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले होते. आता पुन्हा ईडीने बँकेकडून आजी-माजी संचालकांचे फोन नंबर मागवले आहे. २०१४ ते २०२१ या कालावधीत बँकेचे संचालक असणाऱ्यांचे फोन नंबर ईडीने मागवले आहे.
हसन मुश्रीफ यांच्यामागे ईडीचा ससेमिरा गेल्या काही दिवसांपासून लागला आहे. मागील महिन्यात हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील राहत्या घरी ईडी अधिकाऱ्यांनी धाड टाकली होती. ईडी अधिकाऱ्यांनी त्यादिवशी तब्बल अकरा तास मुश्रीफांच्या कुटुंबियांची चौकशी केली होती. ईडी अधिकारी त्यावेळी काही महत्त्वाचे कागदपत्रे घरातून घेऊन गेले होते.
फोन क्रमांक मागवले
मुश्रीफ हे कोल्हापूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे ईडी अधिकाऱ्यांनी कोल्हापूर जिल्हा बँकेतही धाड टाकली. या धाडीदरम्यान ईडी अधिकाऱ्यांनी कागदपत्रांची तपासणी केली. त्यानंतर थेट पाच कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले होते. आता ईडीने बँकेत संचालक असणाऱ्यांचे फोन क्रमांक मागवले आहे. २०१४ ते २०२१ या कालावधीत बँकेचे संचालक असणाऱ्यांचे फोन नंबर ईडीने मागवले आहे. यामुळे हे सर्व संचालक चौकशीच्या फेऱ्यात येणार आहे.
कोणत्या प्रकरणात चौकशी
ब्रिक्स कंपनीला दिलेल्या कर्ज प्रकरणात तीन माजी संचालकांची चौकशी करण्यात आली आहे. या चौकशीनंतर तिघांना ईडीने समन्स बजावले आहे. याच प्रकरणात इतर संचालकांची चौकशी होण्याची शक्यता आहे. या चौकशीनंतर हसन मुश्रीफ यांच्या अडचणीत भर पडणार आहे.
मुलांच्या जमीनला विरोध
माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. कारण हसन मुश्रीफ यांच्या 3 मुलांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर शुक्रवारी सुनावणी झाली होती. यावर ईडीने त्यांच्या जामीन अर्जावर विरोध केला. अटकपूर्व जामीन दिला तर तपासावर परिणाम होण्याची शक्यता असल्याचे सांगत ईडीने विरोध केला.
विरोधकांवर ईडी आणि सीबीआयच्या धाडी टाकल्या जात असल्याचा आरोप काँग्रेस व राष्ट्रवादीकडून केला जात आहे. या आरोपांना भारतीय जनता पक्षाकडून कर नाही तर डर कशाला? असे सागंत उत्तर दिले जात आहे.